MPSC चा निकाल जाहीर; औरंगाबादचा अक्षय दिवाण आणि सांगलीची नम्रता मस्के राज्यात प्रथम

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करण्याची संधी देखील देण्यात आली आहे.

Updated: Dec 8, 2022, 09:26 PM IST
MPSC चा निकाल जाहीर; औरंगाबादचा अक्षय दिवाण आणि सांगलीची नम्रता मस्के राज्यात प्रथम title=

MPSC Result 2022 :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचा(MPSC Exam) निकाल जाहीर झाला आहे. 9 आणि 24 जुलै 2022 रोजी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.  महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट - ब  यासाठी मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण 609 पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत औरंगाबाद जिल्हयातील  अक्षय दिवाण पडुळ  हा राज्यात प्रथम आला आहे. तसेच महिला वर्गवारीतून सांगली जिल्हयातील  नम्रता ज्ञानदेव  म्हस्के हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. मागासवर्गवारीतून जळगांव जिल्हयातील  अक्षय अनिल परदेशी हा राज्यात प्रथम आला आहे.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करण्याची संधी देखील देण्यात आली आहे.

अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे बंधनकारक आहे. या संदर्भातील अधिक माहिती व सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.