Karnataka Maharashtra Dispute: महाराष्ट्र कर्नाटक (Karnataka Maharashtra Dispute) सीमावाद पुन्हा पेटल्याचं पहायला मिळतंय. बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून (Attack on maharashtra truck near belgaum) महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या लोकांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक, शाईफेक केली आहे. या घटनेने सीमावाद आणखीच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यावरून आता राज्यातील अनेक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळतंय. महाराष्ट्र (Maharastra) आणि कर्नाटक (Karnatak) प्रश्न कोणताही असो नेहमी नाव चर्चेत येतं ते 'कन्नड रक्षण वेदिके' (Kannada Rakshana Vedike) या संघटनेचं...
महाराष्ट्राच्या हक्काच्या बेळगावचा (Belgaum) मुद्दा असो किंवा पाणीप्रश्न कन्नड रक्षण वेदिके संघटनेने (Karnataka Maharashtra Dispute) नेहमी आक्रमक भूमिका घेतली. कन्नड लेखक आणि पत्रकार असलेल्या जनागेरे वेंकटरामय्या (Janagere Venkataramaiah) यांनी संघटनेच्या जन्मापासून कन्नड रक्षण वेदिके संघटनेला मोठं केलं. कर्नाटकातील 30 जिल्ह्यात पसरलेल्या या संघटनेच्या तब्बल 12 हजारांहून अधिक शाखा आहेत. फक्त कर्नाटक नाही तर, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तमिलनाडू... एवढंच काय तर अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर या देशात देखील या संघटनेच्या शाखा कार्यरत आहेत.
घटना आहे 2005 ची... बेळगाव महापालिकेवर (Belgaum Municipal Corporation) मराठी एकीकरण समितीची (Maharastra Akikaran Samiti) सत्ता होती. त्यावेळी महापालिकेने महाराष्ट्रात विलीन होण्याचा ठराव मंजूर केला होता. त्याला कन्नड रक्षण वेदिके संघटनेने कडाडून विरोध केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन महापौर विजय मोरे (Vijay More) यांच्या चेहऱ्याला काळं फासलं. त्यानंतर सर्वत्र या संघटनेची चर्चा झाल्याचं पहायला मिळालं. देशभर याची चर्चा देखील झाली होती. त्यानंतर कावेरीच्या पाणीवाटपावरून निर्माण झाल्या वादावर कन्नड रक्षण वेदिके संघटनेने बंद पुकारला होता. अवघ्या 20 मिनिटात संघटनेने बंदचं आवाहन केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाल्याचं पहायला मिळालं होतं.
स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणं, कन्नड भाषेची अस्मिता जोपासणं तसेच त्याचा प्रसार करणं, परप्रांतीयांचे वाढतं वर्चस्व कमी करून कन्नड संस्कृतीचे (Kannada Culture) संरक्षण करणं, असे उद्देश ठेऊन संघटना काम करताना दिसते. शिवसेनेने सुरूवातीच्या काळात मुंबईत जी भूमिका मांडली होती, तशीच काहीशी भूमिका कन्नड रक्षण वेदिके संघटना घेताना दिसते. मात्र, बेळगावच्या बाबतीत कन्नड रक्षण वेदिके संघटनेने अतिशोक्ती केल्याचं पहायला मिळतंय.
आणखी वाचा - Maharastra karnataka dispute: 35 वर्षांपूर्वी छगन भुजबळांनी दिला होता...
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून कन्नड रक्षण वेदिके संघटनेकडून (Kannada Rakshana Vedike) कायम जाणीवपुर्वक महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रकार सुरु केले आहे. पोलिसांचा फौजफाटा असतानाही त्यांच्याकडून सार्वजनिक वाहनांवर हल्ला होत असेल तर त्यांना कोणी फुस लावतंय, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय.