Maharashtra HSC 12th Board Result 2024: बारावीचा निकाल जाहीर; कोकणानं मारली बाजी, यंदाही मुलींचीच आघाडी

Maharashtra HSC 12th Board Result Declared : सर्वाधिक निकाल कोकणाचा तर, सर्वात कमी निकाल कोणत्या विभागाचा? जाणून घ्या कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येत आहेत निकाल...   

सायली पाटील | Updated: May 21, 2024, 02:56 PM IST
Maharashtra HSC 12th Board Result 2024: बारावीचा निकाल जाहीर; कोकणानं मारली बाजी, यंदाही मुलींचीच आघाडी  title=
Maharashtra HSC Board Result 2024 result announdec MSBSHSE Class 12th Result Declared at mahresult.nic.in Check Toppers List and Download Scorecard

Maharashtra HSC 12th Board Result Declared: पदवी शिक्षणाच्या वतीनं टाकलेलं पहिलं पाऊल आणि महाविद्यालयीन जीवनाचा ओलांडलेला पहिला टप्पा म्हणून अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं 21 मे 2024, मंगळवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा निकाल जाहीर करण्यात आला. सीबीएसई आणि आयसीएसईमागोमाग एचएससीच्या बारावी परीक्षेच्या निकालाची टक्केवारीही यंदा वाढल्याचं पाहायला मिळालं. 

किती विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा? 

यंदाच्या वर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. ज्यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,46 विद्यार्थी,  कला शाखेसाठी 3, 81,226 आणि वाणिज्य शाखेसाठी 3, 29,905 विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. व्यावसायिक अभ्यासक्रमातील 37,226 आणि आटीआयमधील 4750 विद्यार्थ्यांचाही निकाल यावेळी जाहीर झाला. 

विषय विद्यार्थी
विज्ञान   7,60,46 
कला   3, 81,226 
वाणिज्य  3, 29,905 
व्यावसायिक अभ्यासक्रम 37,226
आटीआय 4750 

शिक्षण मंडळानं राज्याच्या एकूण निकालाची आकडेवारी जाहीर केल्यानंतर दुपारी 1 वाजता हा निकाल विद्यार्थांसाठी ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात आला. जिथं विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेले गुण पाहता येत आहेत. 

शाखेनुसार निकाल 

विषय  निकालाची टक्केवारी 
विज्ञान  97.82 
वाणिज्य 92.18
कला 85.88
व्होकेशनल 87.75
आयटीआय 87.69

निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांवर क्लिक करा- 

शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली, तर मुलं मातंर यंदाही पिछाडीवर पडली. बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 95.4 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर, 91.60 टक्के मुलं उत्तीर्ण झाली. विभाजनिहाय निकालानुसार कोकण विभागानं यंदा बाजी मारली असून, मुंबईचा निकाल मात्र सर्वाधिक कमी लागल्याचं स्पष्ट झालं. 

मुली 95.4 टक्के
मुलं  91.60 टक्के 

निकालाची विभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे 

कोकण 97.51 %
लातूर  92.36 %
नाशिक 94.71 %
अमरावती 93.00 %
कोल्हापूर 94.24 %
मुंबई 91.95 %
छत्रपती संभाजीनगर 94.08 %
नागपूर 92.12 %
पुणे 94.44 %

हेसुद्धा वाचा : राज्याच्या 'या' भागात सापडली शंकराची भव्य पुरातन पिंड; मंदिर की समाधी, संभ्रम कायम 

पुरवणी परीक्षेसाठी कधी करायचा अर्ज? 

सर्व विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट 2024 आणि फेब्रुवारी-मार्च 2025 या दरम्यान असणाऱ्या दोन संधीच हाताशी असतील. जुलै-ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा  घेतली जाणार आहे. ज्यासाठी 27 मेपासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहेत याची नोंद घ्यावी.