रोहिणी खडसेंच्या पराभवानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

आता नेमके काय झाले ते शोधू असे खडसे यांनी यावेळी म्हटले. 

Updated: Oct 24, 2019, 08:29 PM IST
रोहिणी खडसेंच्या पराभवानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया title=

मुक्ताईनगर : भाजापचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना जळगाव-रावेर मधून उमेदवारी देण्यात आली. यामध्ये रोहीणी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यानंतर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा मतदारसंघ भाजप कमी आणि खडसे म्हणून अधिक ओळखला जातो असे खडसे यांनी म्हटले.  खूप मेहनत केली आमचा पराभव मान्य करतो. आता नेमके काय झाले ते शोधू असे खडसे यांनी यावेळी म्हटले. 

मुक्ताईनगर मध्ये रोहिणी ला तिकीट न देता मला वा कार्यकर्त्याला द्या असे सांगितले होते. तिकिटांच्या फेरबदल अडचणीत येऊ शकतो याची कल्पना आधीच पक्षाला दिली होती. पक्षाला आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असे सांगितले होते याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. 

निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार

गेल्या वेळी माझ्या उमेदवारीला सेनेला काँग्रेस आणि एनसीपीने छुपी युती केली होती. यावेळी त्यांनी ती उघडपणे केली. पण असे असतानाही शिवसेनेने राजीनामा घेतलेला नाही वा कारवाई नाही हे देखील खडसे यांनी बोलून दाखवले. अब की बार 220 पार का साध्य झाले नाही मात्र आता महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.

तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई

LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 

LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ

LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र

LIVE निकाल महाराष्ट्राचा : उत्तर महाराष्ट्र