नात्याला काळीमा! भावाकडून भावाची, पतीकडून पत्नीची तर मुलाकडून बापाची हत्या...

Maharashtra Murder News: आर्थिक कलह आणि कौटुंबिक वादातून नाती दुरावत आहेत. राज्यात हत्येच्या अशा तीन घटना घडल्या आहेत ज्यात केवळ रागातून आपल्याच नात्यातल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: Apr 26, 2023, 04:11 PM IST
नात्याला काळीमा! भावाकडून भावाची, पतीकडून पत्नीची तर मुलाकडून बापाची हत्या...  title=

Maharashtra Crime News : राज्यात नात्याला काळीमा फासणाऱ्या तीन घटना घडल्या आहेत. आर्थिक कलह (Financial Strife) आणि कौटुंबिक वादातून (Family Disputes) नाती दुरावत चालल्याचं या घटनांमधून समोर येतंय. सांगलीत भावाकडून सख्ख्या भावाचा, परभणीत मुलाकडून वडिलांचा तर नागपूरमध्ये पतीने पत्नीचा काटा काढला. या हत्यासत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. 

सख्ख्या भावाला संपवलं
सांगलीत कुपवाड शहरातल्या जूना मिरज-रोडवरील संत रोहिदार मंदिर परिसरात शिंदे कुटुंब राहातं. यातले मोठे बंधू अनिल बाबाजी शिंदे पेशाने डॉक्टर असून त्यांच्या सख्ख्या लहान भावानेच त्यांची हत्या केली. घटनेच्या दिवशी डॉक्टर अनिल शिंदे हे घरात ज्ञानेश्वरीचं वाचन करत होते. त्याचवेळी त्यांचा लहान भाऊ संपत हातात खुरपं घेऊन आला. आरोपी संपतने अनिल शिंदे यांना आधी शिवीगाळ केली, त्यानंतर अचानक त्याने हातातल्या खुरप्याने भाऊ अनिलवर एकामागून एक वार करायला सुरुवात केली. 

अनिल शिंदे यांच्यावर वार केल्यानंतर संपत त्यांच्या पत्नी-मुलांकडे वळला. पण त्याआधीच अनिल शिंदे यांच्या पत्नीने मुलांना घेऊन घराबाहेर पडत आरडाओरडा सुरु केला. आसपासच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी संपत शिंदेला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलं, तर अनिल शिंदे यांचा रुग्णालायत नेण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मुलाने बापाचा काटा काढला
दुसऱ्या एका घटनेत मुलानेच बापाचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे. परपरभणी मानवत रोडवर ताड बोरगाव इथल्या 58 वर्षीय दत्तात्रय भोकरे नावाच्या कामगाराचा मृतदेह एका शेतात आढळला होता. त्याच्या डोक्यात आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. याप्रकरणी मानवत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली. यात दत्तात्रय भोकरे यांच्या मुलानेच त्यांची हत्या केल्याचं समोर आलं. दत्तात्रय भोकरे यांना दारूचं व्यसन होते. कामातून आलेले पैसे ते घरात न देता मित्रांबरोबर दारू पिण्यात उडवत होते. त्यामुळे घरात बिकट आर्थिक परिस्थिती होती. याचा राग त्यांच्या मुलाच्या मनात होता. 

वडिल दारूच्या नशेत असताना संधी पाहून मुलगा परमेश्वर याने वडिलांवर कुऱ्हाडीने दत्तात्रय यांच्या मानेवर आणि खांद्यावर वार करुन हत्या केली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.  

पतीने पत्नीचा केला खून
नागपूरात जागेच्या वादातून पतीने दुसऱ्या पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. शैलजा नागपुरे असं मृत पत्नीचं नाव असून आरोपी पती बाबाराव नागपुरेला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत 56 वर्षीय बाबाराव नागपुरे पहिल्या पत्नीपासून फारकत घेत दुसरी पत्नी शैलजा सोबत राहत होते. हिच्यासोबत बाबाराव यांचा काही दिवसांपासून एका जागेशी धरून वाद सुरू होता. 

आरोपीला बाबाराव शिवणगाव पुनर्वसन इथल्या प्लॉटवर आले होते. त्याचदरम्यान त्यांची पत्नी शैलजा देखील प्लॉटवर आली. त्याच जागेच्या विषयाला धरून दोघात भांडण झालं. रागाच्या भरात बाबाराव ह्यांनी पत्नीच्या डोक्यावर दगडाने वार केला. यामध्ये पत्नी शैलजाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला पतीचा शोध घेत ताब्यात घेतले