शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही ! 'पुढची सगळी बाकडी मोकळी असतात, सरकारचं काय चाललंय?'

Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत पुन्हा एकदा मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्य सरकार गंभीर नाही. (Maharashtra Politics) अनेक लक्षवेधी मांडल्या जात आहेत. (Political News) अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत. जनतेची कामे कशी होणार आहेत. सरकारचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. कुणीही गंभीर नाही, असा संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.  

Updated: Mar 17, 2023, 03:52 PM IST
शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही ! 'पुढची सगळी बाकडी मोकळी असतात, सरकारचं काय चाललंय?' title=

Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत पुन्हा एकदा मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधी पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारला चांगलेच धारेवर धरले. हे राज्य सरकार गंभीर नाही. (Maharashtra Politics) अनेक लक्षवेधी मांडल्या जात आहेत. (Political News) अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत. जनतेची कामे कशी होणार आहेत. सरकारचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. कुणीही गंभीर नाही, असा संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला. 'पुढची सगळी बाकडी मोकळी असतात, सरकारचं काय चाललंय?', असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. ( Maharashtra Political News)

फडणवीस यांच्या दिलगिरीनंतरही पुन्हा मंत्र्यांची दांडी 

विधानसभेत मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिलगिरीनंतरही मंत्र्यांची दांडी दिसून आली. यावेळी विधानसभेत मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा गाजला आहे. दांडी बहाद्दर मंत्र्यांवर अजित पवार बरसलेत. सरकारचा भोंगळ कारभार सुरु आहे. कुणीही गंभीर्याने घेत नाही, पुढची सगळी बाकडी मोकळी असतात, सरकारचं काय चाललंय? असा सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री शिंदेही सभागृहात उपस्थित नव्हते. यावरुन अजित पवार यांनी टोला लगावता म्हणाले, पुढची सगळी बाकडी मोकळी असतात.  सरकारचं काय चाललंय? कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर

सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज दुसऱ्या दिवशी..

दरम्यान,  लक्षवेधीवर उत्तर देण्यास मंत्रीच नसल्याने विधानपरिषद 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. त्याआधीही अनेक मंत्री उपस्थित नसल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरुन हा विषय गंभीर आहे. आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे फडणवीस म्हणाले होते.  दोन दिवसांपूर्वी लक्षवेधीसाठी घेतलेल्या विशेष कामकाजावेळी विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज दुसऱ्या दिवसावर पुढे ढकलण्याची वेळ आली. सभागृहात आमदारांकडून याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. भाजप आमदार कालिदास कोळंबकर आणि तालिकाअध्यक्ष संजय शिरसाट यांनीही सरकारला घरचा आहेर दिला. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेत्यांनीही सरकारला धारेवर धरलं. तर मंत्र्यांना याबाबत समज दिली जाईल असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर मंत्र्यांच्या उपस्थितीचा मुद्दा चर्चेला आला.

तर दुसरीकडे विधानपरिषदेत लक्षवेधी लागली की ती घेतली जाऊ नये यासाठी गळ घातली जाते. संबंधित व्यक्ती येऊन आपल्याला भेटतात अशी माहिती विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी दिली. हे योग्य नाही, असं कोणीही करू नये असं त्यांनी बजावलं.