Maharashtra HSC Result 2023 Today: आज बारावीचा निकाल, दुपारी 2 वाजता 'इथे' पाहता येईल 12 वी चा रिझल्ट

Maharashtra HSC Result 2023 Today: कुठे पाहता येईल बारावीचा निकाल? पाहा एका क्लिकवर सर्व प्रश्नांची उत्तरं   

Updated: May 25, 2023, 11:54 AM IST
Maharashtra HSC Result 2023 Today: आज बारावीचा निकाल, दुपारी 2 वाजता 'इथे' पाहता येईल 12 वी चा रिझल्ट title=
maharashtra board HSC Results 2023 to be announced on 25 may 2023

Maharashtra HSC 12th Result 2023: आज म्हणजेच 25 मे 2023 रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. अतिशय मन वर्षभराचा अभ्यास आणि दिलेल्या परीक्षेचा निकाल हाती येणार असल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये आतापासूनच धाकधुक वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान आणि तांत्रिक शिक्षणासंबंधीच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी पदवी शिक्षणासाठीच्या प्रवेशांसंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. 

कुठे पाहाल निकाल? 

दरम्यान परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या लिंकवर जाऊनही निकाल पाहू शकतात. 

यंदाच्या वर्षी साधारण 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यामुळं आता उद्या (गुरुवारी) खऱ्या अर्थानं 14 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार आहे. बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये सध्या तीन संकेतस्थळांचा उल्लेख करण्यात आला असून, ती वर नमूद करण्यात आली आहेत. या संकेतस्थळांवर कोणत्या विषयांत किती मार्क मिळाले इथपासून विद्यार्थ्यांना निकालाची टक्केवारीही कळणार आहे. 

हेसुद्धा वाचा : तीन टन कांदा विकूनही शेतकऱ्यांनंच दिले व्यापाऱ्याला पैसे; पोशिंद्यावर का आली रडकुंडीची वेळ ?

काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बोर्डाकडून निकालासंदर्भातील तयारी पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं होतं. या घोषणेनंतर साधारण आठवड्याभराच्या काळातच निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाला किंवा निकालासाठी देण्यात आलेल्या कोणत्याही संकेतस्थळाला भेट दिली असता तिथं त्यांना प्राथमिक माहितीचा तपशील भरून पुढे Marksheet पाहता येईल. 

विद्यार्थ्यांनो घाबरू नका... 

निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तिथं विद्यार्थानी काळजीपूर्वक सर्व माहिती आणि हॉलतिकीट क्रमांक भरावा. ज्यानंतर पुढच्याच क्षणाला निकाल तुमच्या समोर असेल. पण, निकाल पाहण्यासाठी 14 लाखांहून अधिक विद्यार्थी एकाच वेळी Website ला भेट देणार असल्यामुळं त्यामध्ये काही तांत्रिक अडचणीसुद्धा येऊ शकतात. असं झाल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काही वेळानंतर निकाल पाहण्यचा प्रयत्न करावा हेच आवाहन. शिवाय निकाल लागल्यानंतर मनाजोगी टक्केवारी मिळाली नाही, किंवा काहींना यश मिळालं नाही, तरीही निराश होऊ नका!