लासलगावमध्ये बंदला हिंसक वळण... बसवर दगडफेक

भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद लासलगाव येथेही उमटलेत. लासलगाव बंदला सकाळीच हिंसक वळण लागलंय.

Updated: Jan 3, 2018, 09:26 AM IST
लासलगावमध्ये बंदला हिंसक वळण... बसवर दगडफेक  title=

निफाड : भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद लासलगाव येथेही उमटलेत. लासलगाव बंदला सकाळीच हिंसक वळण लागलंय.

सकाळी मनमाडकडून लासलगावकडे येणारी बस लासलगावमधील रेल्वे गेटजवळ आल्यावर काही समाज कंटकांनी दगडफेक करून फोडली... बसमध्ये प्रवेश करीत बस जाळण्याचा प्रयत्न केला गेला.

या वेळेस बसमध्ये पाच - सहा शालेय विद्यार्थ्यांसह इतर तीन प्रवासी होते. सतर्कपणा दाखवत चालक आणि वाहकांनी प्रवाशांना बसच्या खाली उतरवून दिले... आणि बस थेट बस डेपोमध्ये घेऊन गेले... त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात समाज कंटकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.   

LIVE : महाराष्ट्र बंदचे क्षणाक्षणाचे अपडेट