'तुमचा कोणता पक्ष, राष्ट्रवादी...', एकनाथ शिंदेंनी म्हणताच अजित पवारांनी दिलं उत्तर; फडणवीसांनाही हसू अनावर

Mahayuti Press Conference: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं (Mahayuti) सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. महायुतीला 230 पेक्षा जास्त जागा मिळत असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान विजयाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पत्रकार परिषद घेतली असता त्यात जुगलबंदी पाहण्यास मिळाली.   

शिवराज यादव | Updated: Nov 23, 2024, 08:22 PM IST
'तुमचा कोणता पक्ष, राष्ट्रवादी...', एकनाथ शिंदेंनी म्हणताच अजित पवारांनी दिलं उत्तर; फडणवीसांनाही हसू अनावर title=

Mahayuti Press Conference: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं (Mahayuti) सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. महायुतीला 230 पेक्षा जास्त जागा मिळत असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान विजयाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पत्रकार परिषद घेतली असता त्यात जुगलबंदी पाहण्यास मिळाली. एकनाथ शिंदे यांनी खऱ्या राष्ट्रवादीवरुन अजित पवारांना विचारलं असता त्यावर अजित पवारांनीही उत्तर दिलं. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ सुरु झाला होता. 

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "2019 ला जे सरकार स्थापन व्हायला हवं होतं, ते झालं नाही. लोकांनी हे चांगलंच लक्षात ठेवलं आहे. लोक हे विसरलेले नाहीत". यानंतर त्यांनी अजित पवारांना, तुमचा कोणता पक्ष, राष्ट्वादी ना. आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं असं सांगितलं. त्यावर अजित पवारांनी शिवसेना कोणाची तेदेखीवल ठरवलं आहे असं उत्तर दिलं. यानंतर देवेंद्र फडणवीसांसह सर्वांनाच हसू अनावर झालं. 

...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठले

 

अजित पवार म्हणाले की, "आज सकाळी मतमोजणी सुरु होईपर्यंत सर्वणज अंदाज व्यक्त करत होते. आम्ही तिघं कशातच जमा नव्हतो. आम्ही पावणे दोनशेच्या पुढे जाऊ की नाही असं वाटत होतं. पण महाराष्ट्रातील जनतेते विकासाकडे पाहून यश मिळवून दिलं आहे, त्याबद्दल मी आभार मानत आहेत. सगळे कार्यकर्ते, उमेदवार राबले. आमच्या योजनांची मस्करी करण्यात आली, दोष देण्यात आला". 

"लोकसभेत आम्हाला मोठं अपयश आलं होतं. पण ते मिळालं, मान्य केलं, त्यातून पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. सगळे उताणे पडले. पण उलट आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे. मी राजकारणात आल्यापासून महायुती किंवा आघाडीला इतकं मोठं यश मिळाल्याचं ऐकिवात नाही. अलीकडच्या काळात इतकं मोठं यश पहिल्यांदाच मिळालं आहे. आता खूप काम करावं गाले असं देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन सांगितलं. केंद्र सरकार पाठीशी असल्याने भक्कम आधार आहे," असंही अजित पवार म्हणाले. 

'आता आपल्याला....', महायुतीचं सरकार येताच अजित पवारांचा फडणवीसांना फोन, 'मी राजकारणात आल्यापासून...'

संजय राऊत यांनी बॅलेट पेपरेने पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. त्यावर ते म्हणाले की, "बॅलेट पेपरेने लोकसभेतही घ्यायला होतं". "सगळीकडे महायुती जोरात चालली आहे. जनतेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. महायुती शेवटपर्यंत कशी काम करेल यासाठी प्रयत्न करु. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करु," असंही अजित पवारांनी सांगितलं. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही नतमस्तक आहोत. हा विजय आमची जबाबदारी वाढवणारा आहे. नरेंद्र मोदींवर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. महाराष्ट्रात खूप काम करावं लागणार याची जाणीव होत आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेपुढे नतमस्तक होऊन विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन देतो".

"ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली अशी होती. लोकांनी प्रेमाचा, मतांचा वर्षाव आमच्यावर केला. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी अशा सर्वांनी महायुतीवर प्रेम दाखवलं. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आम्ही ना भूतो, ना भविष्यो असे निर्णय घेतले. जी कामं थांबवण्यात आली होती, ती आम्ही सुरु केली. अटल सेतू, समृद्धी, कोस्टल रोड झाला. मोदींनी भूमीपूजन केलेल्या प्रकल्पांचं त्यांच्याच हस्ते उद्घाटन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. राज्याच सर्वांगीण विकास करताना सर्व घटकांना समोर ठेवलं होतं. अडीच वर्षात जी कामं थांबवली होती, ती किती वेगाने सुरु करु शकलो याचा आनंद, समाधान आहे. आम्ही कल्याणकारी योजनाही आणल्या," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.