मुंबई : राज्यात आज कोरोनाचे २०,५९८ नवे रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात २६,४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका दिवसात राज्यात ४५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा मृत्यूदर हा २.७ टक्के झाला आहे.
राज्यात रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ७३.१७ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात ८,८४,३४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,७२,२४१ रुग्णांची कोरोना चाचणी झाली असून १२,०८,६४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १८,४९,२१७ व्यक्ती हे होम क्वारंटाईन असून ३५,६४४ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तर राज्यात सध्या २,९१, २३८ रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत.
मुंबईत आज कोरोनाचे २२०९ रुग्ण वाढले असून ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ठाण्यात आज कोरोनाचे ३१३ रुग्ण वाढले असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे मनपा क्षेत्रात आज कोरोनाचे ४०४ रुग्ण वाढले असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत आज कोरोनाचे ३६२ रुग्ण वाढले असून ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाचे ४७८ रुग्ण वाढले असून १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रायगडमध्ये आज कोरोनाचे ४१४ रुग्ण वाढले असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वसई-विरारमध्ये आज कोरोनाचे २६७ रुग्ण वाढले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.