... तर सप्तश्रृंगी गडावरील अपघात टळला असता; ग्रामस्थांनी दिली मोठी माहिती

Nashik Bus Accident: नाशिकमध्ये (Nashik) बस दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. पहाटे सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Fort) बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 12, 2023, 02:59 PM IST
... तर सप्तश्रृंगी गडावरील अपघात टळला असता; ग्रामस्थांनी दिली मोठी माहिती title=
Maharashtra 1 Dead 18 Injured in Nashik Bus Accident

योगेश खरे, झी मीडिया

 Nashik Bus Accident News: सप्तश्रृंगी गडावर (Saptshrungi Fort) बस दरीत कोसळून मोठा अपघात घडला आहे. या अपघातात 1 जण ठार तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. सप्तश्रृंगी घाटातील गणपती पॉइंटजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात एक धक्कादायक माहिती समोर येतेय. हा अपघात टाळता येणं सहज शक्य होतं, अशी माहिती समोर येते आहे. (Nashik Bus Accident)

सप्तश्रृंगी गडावरील अवघड वळण असणाऱ्या गणपती पॉइंटजवळ बस दरीत कोसळली आहे, बस जवळपास 100 ते 150 फूट खाली कोसळली. या बसमध्ये असलेले 18 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हा घाट मार्ग अवघड असल्याचे मानले जाते. पावसाळ्यात व हिवाळ्यात या ठिकाणी अनेक अपघात होतात. २००८मध्येही असाच एक अपघात झाला होता. त्यानंतर आज पुन्हा असाच एक अपघात झाला आहे. मात्र, हा अपघात टाळता येणे शक्य होतं, अशी माहिती झी 24 तासच्या हाती लागली आहे. 

गेल्या महिन्यात सप्तशृंगी गडावर दरड कोसळली होती. त्यामुळं सप्तशृंगी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला घाटातील रस्ता दुरुस्तीचे पत्र दिले होते, तसंत, रस्त्यावर मार्गदर्शक, साइन बोर्ड, खड्डे बुजवणे, कठडे दुरुस्त करणे, याबाबत तातडीने उपाययोजना आखण्याचे आवाहन करण्यात आलं होतं.  वारंवार सूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. या अपघातानंतर तरी सरकारचे डोळे उघडणार का? व उपाययोजना करणार  का?, असा सवाल केला जात आहे. 

अपघात कसा झाला?

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. सप्तश्रृंगी गडावर बस मुक्कामाला होती. पहाटेच ही बस निघाली होती. पहाटे घाटात मोठ्या प्रमाणात धुकं होतं. धुक्यामुळं रस्ता समजत नव्हता. चालकाला उजव्या बाजूला बस वळवायची होती मात्र धुक्यामुळं रस्ता न समजल्यामुळं बस सरळ चालवली. त्यामुळं ती घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली  आहे. 

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.  पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.