पालघर : रिलायन्स गॅस पाईपलाईन पीड़ित शेतकऱ्यांकडून पालघर जिल्ह्यातील ढेकाळे ते मुंबई मुख्यमंत्री निवास असा लाँग मार्चला सुरुवात झाली. २०१५ साली दहेज ते नागोठणे असं रिलायन्स गॅस पाईपलाईनचं काम सुरु करण्यात आलं होतं. यासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली.
भूसंपादन करताना जिल्ह्यातील तलासरी ,डहाणू, पालघर , विक्रमगड आणि वाडा या तालुक्यातील आदिवासी निरक्षर जनतेची रिलायन्सकडून मोठी फसवणूक करण्यात आल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय. हा 'लाँग मार्च' १५ ऑगस्टला मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवास्थानी निवेदन देऊन नंतर मुख्यमंत्री निवास्थान वर्षा बंगला इथं ठिय्या आंदोलन करणार आहेत.