पुलवामा हल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये व्यापाऱ्यांचा लॉंग मार्च

कल्याण पश्चिमेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाणे बंद ठेवत झलेल्या हल्ल्याचा निषेध केला. व्यपाऱ्यांनी शिवाजी चौकातून लॉंग मार्च काढला. 

Updated: Feb 16, 2019, 02:11 PM IST
पुलवामा हल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये व्यापाऱ्यांचा लॉंग मार्च  title=

कल्याण : पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण पश्चिमेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाणे बंद ठेवत झलेल्या हल्ल्याचा निषेध केला. व्यपाऱ्यांनी शिवाजी चौकातून लॉंग मार्च काढला. सर्व प्रथम व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार घालून मार्चला सुरुवात केली. यावेळेस जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या ह्ल्ल्याच्या निषेधार्थ हल्ल्याचा मास्टरमाइंड आदील अहमद दारचा पुतळा जाळण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळत आहे. हल्ल्याचे पडसाड नालासोपाऱ्यातही पहायला मिळत आहेत. नालासोपाऱ्यात नागरिकांकडून रेल रोको करण्यात आला. नालासोपारा आणि विरार स्थानकातील रुळांवर उतरुन नागरिक निषेध व्यक्त केला. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आज नालासोपारा बंदचे आवाहनही करण्यात आले आहे. नगारिकांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केले आहे. नागरिकांनी वाहन अडवून ठेवली असून शाळा आणि दुकानंही बंद केली आहेत. 

७ जणांना केली अटक 
पुलवामायेथे झालेल्या हल्ल्याच्या निशेधार्थ सुरक्षादलाकडून ७ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ६ आतंकवाद्यांना सिंबू तर एकाला लारु भागातून अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या विशेषज्ञांची संपूर्ण टीम पुलवामात घटनास्थळी दाखल झाली असून शोधकार्य जोरात सुरु आहे.

अमेरिकेनेही केला निषेध
दहशतवादाविरधी लढ्यात अमेरिकेने भारत सरकारला संपूर्ण पाठिंबा दर्शवत पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. भारताला पाठींबा दर्शवत पाकिस्तानचा निषेध केला आहे. दहशवादाला थारा देणे थांबवा असा सज्जड दम अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे.