लोकसभा निवडणूक २०१९ : सांगली लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

२३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

Updated: Apr 4, 2019, 01:25 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : सांगली लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम title=

सांगली : सांगलीमध्ये भाजपकडे संजय पाटील यांच्यासारखा ताकदवान उमेदवार आहे. त्यामुळे येथे भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. सांगलीमध्ये विरोधकांकडे सक्षम उमेदवार नाही आहे. मतदारसंघातील अनेक कामांसाठी त्यांनी निधी आणल्याने लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद आहे. राजू शेट्टी यांनी हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याची मागणी केली होती. काँग्रेसने त्यांना ही जागा दिली आहे. स्वाभिमानीने विशाल पाटील यांना येथून उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने येथे जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे. २३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

२०१४ निवडणुकीचा निकाल

संजयकाका पाटील यांचा २ लाख ३९ हजार २९२ मतांनी विजय झाला होता. काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता.

 

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

 पक्ष

 मतदान

संजयकाका पाटील  भाजप 611563
प्रतिक पाटील काँग्रेस 372271
नानासो बंडगर बसपा 11378
नितीन सावगवे बहुजन मुक्ती पक्ष 8405
सुरेश माने अपक्ष 8353