जालना : जालना मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यामध्ये २३ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत जालना मतदारसंघातून भाजपनं त्यांचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने विलास औताडे यांना तिकीट दिलं आहे. वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. शरदचंद्र वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
२०१४ साली जालन्याच्या मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे विजयी झाले होते. रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा २,०६,७९८ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
रावसाहेब दानवे | भाजप | ५,९१,४२८ |
विलास औताडे | काँग्रेस | ३,८४,६३० |
शरदचंद्र वानखेडे | बसपा | २३,७१९ |
जावेद वहाब | अपक्ष | ७,७०४ |
ज्ञानेश्वर नाडे | अपक्ष | ६,९५३ |