सातारा : लोकसभा मतदारसंघातले युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते आणि मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री विजय शिवतारे नितीन बानुगडे पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज भरला आहे. नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे उदयराजे यांनी आतापर्यंत साताऱ्याची जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे. प्रथमच शिवसेना त्यांना टक्कर देणार आहेत. मात्र, त्यांचा टिकाव किती लागणार याचीच चर्चा आहे. हा मतदार संघ शिवसेना राष्ट्रवादीकडून आपल्याकडे खेचणार का, याचीही चर्चा सुरु झाली आहे.
साताऱ्यात उमेदवारी बदलण्याची चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी उदयनराजे यांनी विरोधी गोटात जाऊन आपलीही सगळीकडे मैत्री आहे, असे सांगत राष्ट्रवादीवर दबाव वाढविला होता. तर दरम्यानच्या काळात उदयनराजे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. उदयनराजेंवर राष्ट्रवादी नाराज आहे, असेही वृत्त होते. मात्र, शरद पवार यांनी येथे लक्ष घालून वादावर पडदा टाकला आणि उद्यनराजेच लोकसभेचे उमेदवार असतील असे स्पष्ट केले.
दरम्यान, आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंची डायलॉगबाजीचांगलीच फेमस आहे. त्यात आता साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनीही डायलॉगबाजी सुरू केलीय. आमदार शिवेंद्रराजेंचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक गाणं तयार केलंय. त्यातले अनेक डायलॉग ऐकून शिवेंद्रराजेंना डायलॉग मारण्याचा मोह आवरला नाही. कार्यकर्त्यांसमोर मिशीला पिळ भरत 'जे हाय ते हाय, जे नाय ते नाय' असा डायलॉग त्यांनी मारला. त्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.