नागपूर : नागपूरमध्ये नितीन गडकरींनी काँग्रेसच्या नाना पटोलेंचा पराभव केला आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये नाना पटोले आघाडीवर होते, त्यामुळे नागपुरात मोठा उलटफेर होतोय का काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण गडकरींनी २ लाखांपेक्षा जास्तची आघाडी घेतल्यानंतर गडकरींचा विजय निश्चित झाला.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र युतीला विदर्भातल्या दोन जागा गमवाव्या लागल्या.
अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला.
हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूरच्या लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं. भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसने नाना पटोलेंना मैदानात उतरवलं. नाना पटोले यांनीही गडकरींना कडवं आव्हान दिलं.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियामधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. आता या निवडणुकीत पुन्हा एकदा असाच करिश्मा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
२०१४ साली नागपूरमधून नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांचा २,८४,८२८ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
नितीन गडकरी | भाजप | ५,८७,७६७ |
विलास मुत्तेमवार | काँग्रेस | ३,०२,९१९ |
मोहन गायकवाड | बसपा | ९६,४३३ |
अंजली दमानिया | आप | ६९,०८१ |
नोटा | ३,४६० |