'अंबादास लहान, मी गुरु...' लोकसभा का हवीय हे सांगावं- दानवेंच्या नाराजीवर काय म्हणाले खैरे?

Lok Sabha Election 2024: अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरेंसमोर उघड नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 16, 2024, 01:29 PM IST
'अंबादास लहान, मी गुरु...'  लोकसभा का हवीय हे सांगावं- दानवेंच्या नाराजीवर काय म्हणाले खैरे? title=
Chandakant Khaire On Ambadas Danve

Lok Sabha Election 2024: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून छत्रपती संभाजीनगर येथील लोकसभा जागा चंद्रकांत खैरे लढवणार असल्याची माहिती पुढे आली. यानंतर शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरेंसमोर उघड नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खैरेंना तिकीट देण्यात आलं. यामुळे दानवे नाराज असल्याबद्दल खैरेंना विचारण्यात आलं. यावर बोलतानामी तिकीट देणारा कोण , त्यांनी तिकीट वरून मागावे, उद्धवजींकडे त्यांनी तिकीट मागावे, असे ते म्हणाले. 

माझं काही म्हणणं नाही, स्तंभ पूजनाचा महूर्त होता म्हणून मी केला. त्यांना मी डावलले असते तर ते इथपर्यंत आले नसतेत्यांना लोकसभा का हवी हे त्यांनी सांगावे, असा प्रश्न खैरेंनी विचारलाय.

लोक मला खासदार म्हणून पाहतायत

तसेच मी कडवट शिवसैनिक आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली  काम करतोय. मला गेल्यावेळी काही मंडळीनी पाडले तरी मी काम सुरू ठेवले. मी 5 वर्ष काम करतोय. लोक मला खासदार म्हणून पाहतायत. दानवेचा गुरू मी आहे. तो माझा शिष्य आहे. असे का करतात माहीत नाही, असे ते म्हणाले. 

संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरेंचे नाव, अंबादास दानवेंची उघड नाराजी?

मग आंबदास मोठा कसा झाला? 

मी एकांगी निर्णय घेत नाही. दानवे हे शिंदे सेनेत जाणार हे मला वाटत नाही. त्यांना तिकीट मिळाले तरी मी पक्षाचा आदेश मानणारा माणूस आहे. इथले खासदार काम करत नाही म्हणून लोक मला लढायला सांगतायत. नेतृत्व उभे केले नाही असा माझ्यावर आरोप होतो मग आंबदास मोठा कसा झाला? असा प्रश्न त्यांनी विचारला.मला तिकीट मिळाले किंवा नाही मिळाले तरी मी इथेच राहणार आहे. मला अनेकांनी फोन केले पण मी गेलो नाही.. राज साहेबांवेळी सुद्धा लोकांना असे वाटले होते मात्र मी गेलो नाही.

अंबादास लहान आहे म्हणून

मी कडवट शिवसैनिक आहे. इथं मोदी जी लढायला आले तरी चालेल, मला तिकीट मिळल्यावर मी सगळ्यात जास्त मतांनी निवडून येईल. अंबादास लहान आहे म्हणून त्याची मनधरणी करावी लागेल. काल मी त्यांच्याशी प्रेमाने बोललो. ते माझं ऐकतील असे खैरे म्हणाले.

'10 वर्षांपासून इच्छुक आहे तरी...'; शिंदे गटात जाण्यावरुन अंबादास दानवेंनी स्पष्ट केली भूमिका