पाकिस्तानवर एकदाच काय तो घाव घाला -उद्धव ठाकरे

पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरे यांची मागणी

Updated: Apr 9, 2019, 01:41 PM IST
पाकिस्तानवर एकदाच काय तो घाव घाला -उद्धव ठाकरे title=

लातूर : औसामध्ये आज युतीची सभा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वचनपत्राचं कौतुक केलं. 'भाजपने जे वचन दिलं आहे त्यामुळेच शिवसेना तुमच्यासोबत आहे. राम मंदिर, काश्मीरमधील ३७० कलम आणि शेतकरी हा जाहीरनाम्याचा केंद्रबिंदु आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात थापा मारल्या आहेत. गरीबी हटाव म्हणणाऱ्या राहुल गांधीजी तुमची गरीबी गेली पण बाकीच्या लोकांची कधी जाणार.'

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'आधीचं सरकार दहशतवाद्यांसमोर माना झुकवणारं सरकार होतं. पण आजचं सरकार पाकिस्तानने जर कुरापत काढली तर नुसतं बोलत नाही ठोकणार. तर ठोकतोच आणि ठोकणारच. पंतप्रधानांनी याच्यापुढे पाकिस्तानला कुरापत काढण्यासाठी देखील शिल्लक ठेवू नये. एकदाचा काय तो असा घाव घाला की पाकिस्तानचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नाही पाहिजे. हीच आमची आणि देशवासियांची इच्छा आहे.'

'वल्लभभाई जसे मराठवाड्याच्या पाठिशी उभे राहिले. तशी तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे. अवकाळी, दुष्काळ यासंकटात तुम्ही आमच्यासोबत खंबीरपणे उभे राहा अशी मी विनंती करतो आहे. राज्य सरकार चांगलं काम करते. पण कधीकधी केंद्र सरकारच्या आर्शिवादाची गरज असते. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या विमा कंपन्यांना धडा शिकवा.' अशी मागणी देखील उद्धव यांनी केली.