जालना : प्रचारात उन्हाच्या तडाख्याने भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आजारी पडले आहेत. कालपासून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत प्रदेशाध्यच आजारी पडल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महायुतीचे जालना लोकसभा मतदार संघातील उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दानवे यांच्या प्रचारार्थ मामा चौक ते कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत भाजप, शिवसेनेसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली संपल्यानंतर कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर दानवे यांच्या प्रचारार्थ सभा देखील घेण्यात आली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेत घेतले.
दरम्यान, पाकिस्तानने भारतचे ४० अतेरिके मारल्याचे वक्तव्य केल्याने रावबाहेब दानवे अडचणीत आलेत. ते सोलापूर मतदार संघाचे उमेदवारांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी भाजप कार्यकर्ता संकल्प मेळाव्यात बोलत होते. त्यांनी हे चुकून वक्तव्य केल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र, विरोधकांना त्यांनी आयते कोलीत दिले आहे. त्यांच्याकडून असे वक्तव्य झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आपल्या भाषणातून नेहमीच तोल सोडून बोलणारे दानवे यांनी चक्क आपल्या पत्नीचीच खिल्ली उडविली. लातूरमध्ये भाजपच्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर ते जाहीर सभेत बोलत होते. सोनिया गांधी यांच्या बोलताना त्यांनी आपल्या पत्नीला खिचडी बनविता येत नसल्याचे सांगत मोठा किस्सा सांगत खिल्ली उडविली. नव्याने लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मी दोन महिने पत्नीला माहेरी ठेवले, अशी कबुली दिली. माहेरहून परतल्यानंतर पत्नी खिचडी बनवायला शिकली. पहिल्यांदा खिचडी बनविताना पुस्तकात वाचून ती बनवत असे. खिचडीचे सर्व साहित्य पत्नीने पातेल्यात टाकून ठेवले. अर्धा तास होऊन गेला तरी खिचडी झालीच नाही. कारण तिने स्टोव्हच पेटविला नव्हता. कारण ते पुस्तकात लिहिले नसल्याचे सांगताच एकच हशा पिकला.