रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन १५ जुलैपर्यंत कायम

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव  होऊ नये यासाठी 'मिशन ब्रेक द चेन'अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे.

Updated: Jul 9, 2020, 11:42 AM IST
रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन १५ जुलैपर्यंत कायम title=
संग्रहित छाया

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव  होऊ नये यासाठी 'मिशन ब्रेक द चेन'अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत १५ जुलै २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. या कालावधीत पूर्वीच्या लागू असलेल्या निर्बंधांना पंधरा जुलै २०२० पर्यंत कायम ठेवण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रीन झोनमधून ऑरेंजझोनकडे वाटचाल केल्यानंतर पुन्हा ग्रीन झोन जिल्हा झाला होता. मात्र, त्यानंतर मुंबई, पुणे येथून आलेल्या काहींमुळे कोरोना संक्रमनात भर पडली. दिवसागणिक रत्नागिरी जिल्ह्यात रुग्ण वाढत आहेत. रत्नागिरी, दापोली, चिपळूण येथे कंटनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव  होऊ नये यासाठी  मिशन #BreakTheChain अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत १५ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आधीची मुदत ८ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत होती. पुन्हा लॉकडाऊन वाढवलेल्या कालावधीत पूर्वीच्या लागू असलेल्या निर्बंधांना १५ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता १ ते ८ जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे, याचा प्रसार आता ग्रामीण भागापर्यंत होवू नये म्हणून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक वाहने फक्त चालू राहणार आहेत.  जिल्ह्यात सर्व दुचाकी, तीन चाकी, चारचाकी बंद (अत्यावश्यक सेवा वगळता) सगळ्या वाहनांवर बंदी आहे.