Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी की महायुती कोणाला बहुमत मिळणार, याची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर
23 Nov 2024, 10:42 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: दिलीप वळसे पाटील 4264 मतांनी आघाडीवर
आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील 4264 मतांनी आघाडीवर
23 Nov 2024, 10:41 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: गुलाबराव पाटील सातव्या फेरी अखेर आघाडीवर
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील सातव्या फेरी अखेर 21, 980 मतांनी आघाडीवर
23 Nov 2024, 10:33 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महायुतीची जोरदार मुसंडी, भाजपची 122 जागांवर आघाडी
भाजप- 122
शिवसेना (शिंदे)- 58
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष)- 37
काँग्रेस- 20
शिवसेना (उद्धव ठाकरे)- 19
राष्ट्रवादी काँग्रेस (SP)- 10
इतर-18
23 Nov 2024, 10:23 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अमरावती अचलपूरमधून बच्चू कडू यांना मोठा धक्का
बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. अकराव्या फेरीअखेर बच्चू कडू यांना 23 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर, भाजपचे प्रवीण तायडे आघाडीवर आहे.
23 Nov 2024, 10:21 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: लातूरमधून अमित देशमुख पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख पिछाडीवर. अखेर 5 व्या फेरीत भाजप उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर 1345 मतांनी आघाडीवर
23 Nov 2024, 10:15 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अपक्ष उमेदवार समीर भुजबळांना मोठा धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: नांदगाव मतदार संघात पाचव्या फेरी अखेर शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे २३,२०० मतांनी आघाडीवर. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना मोठा धक्का
23 Nov 2024, 10:11 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मतमोजणीत मोठे उलटफेर, महायुतीची 204 जागांवर आघाडी, तर महाविकास आघाडी...
विधानसभा निवडणुकांचे पहिले कल समोर आले आहेत. महायुतीने 204 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, मविआ 49 जागांवर आघाडी घेतली आहे,
भाजप- 111
शिवसेना (शिंदे)- 58
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष)- 35
काँग्रेस- 20
शिवसेना (उद्धव ठाकरे)- 18
राष्ट्रवादी काँग्रेस (SP)- 9
इतर-16
23 Nov 2024, 10:06 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: चौथ्या फेरीअखेर अजित पवार 15245 मतांनी आघाडीवर
बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार 15245 मतांनी आघाडीवर आहेत.
अजित पवार 35,329
युगेंद्र पवार 20,084
23 Nov 2024, 10:01 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मतमोजणीत मोठे उलटफेर, महायुतीची 160 जागांवर आघाडी, तर महाविकास आघाडी...
विधानसभा निकालांत मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. महायुतीने मोठी मुसंडी मारली असून 160 जागांवर आघाडीवर आहे. तर, मविआ 100 जागांवर आघाडी आहे. तर अपक्ष व इतर लहान पक्षांनी 18 जागांवर आघाडी घेतली आहे.
23 Nov 2024, 09:56 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिर पुन्हा आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सरोज अहिरे यांची तिसऱ्या फेरी अखेर मोठी आघाडी. तर, शिंदे आणि ठाकरे पक्षाचे उमेदवार पिछाडीवर. 11,326 मतांनी सरोज अहिरे आघाडीवर
सरोज अहिरे - 17562
राजश्री आहेरराव - 6236
योगेश घोलप -4159