Maharashtra Results LIVE: शिवाजी पाटील यांचं औक्षण करत असताना उडाला भडका

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE:  राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात? ठळक घडामोडी आणि निकालाचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर 

Maharashtra Results LIVE: शिवाजी पाटील यांचं औक्षण करत असताना उडाला भडका

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी की महायुती कोणाला बहुमत मिळणार, याची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर

23 Nov 2024, 06:06 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?

तुळजापूर ,उमरगा, धाराशिव व परंडा या चार विधानसभा मतदार संघाची आज मतमोजणी पार पडणार आहे. जिल्ह्यातील ६६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. या मतमोजणीसाठी पंधराशे पोलीस पंधराशे होमगार्ड तर सव्वाशे पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील धाराशिव, उमरगा, तुळजापूर आणि परंडा या चार ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे. चार मतदारसंघापैकी दोन मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली असून एक मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस तर एका मतदार संघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत झाली आहे. आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत व भाजपाचे तुळजापूरचे उमेदवार राणा जगजित सिंह पाटील यांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिल आहे .

23 Nov 2024, 06:05 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मतमोजणी केंद्रात कर्मचाऱ्यांची कसून तपासणी

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आठ वाजेला सुरुवात होणार आहे. त्याआधी कर्मचाऱ्यांना पहाटे मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येत आहे. नंदुरबार येथे सर्व मतमोजणी करणारे कर्मचाऱ्यांची सकाळी साडेपाच वाजता मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. यावेळी त्यांची कसून तपासणी करण्यात आली. मतमोजणी केंद्रावर हे कर्मचारी दाखल झाल्यानंतर सुरुवातीलाच त्यांची तपासणी करण्यात आली.

23 Nov 2024, 05:42 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: विधानसभा निवडणुकीच्या निकाला अगोदर जळगाव शहरात वातावरण तापले

विधानसभा निवडणुकीच्या निकाला अगोदर जळगाव शहरात वातावरण तापले आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा भागात भाजप आणि अपक्ष उमेदवार कुलभूषण पाटील यांचे कार्यकर्ते भिडले. जळगाव शहरातील पिंप्राळा भागात ठाकरे सेनेचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांचे आणि भाजपचे माजी नगरसेवक यांच्यात बाचाबाची

23 Nov 2024, 05:42 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: भाजप महायुतीकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर

बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपकडून नेत्यांवर जबाबदारी. रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरेंवर जबाबदारी. अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप महायुतीकडून जोरदार फिल्डिंग