काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात निवडणूक अधिका-यांकडे तक्रार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊनही अद्याप कोणत्याही पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. जागावाटपाचा तिढा अद्याप महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो त्यात दिसून येतोय. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडीचा थोडक्यात आढावा एका क्लिकवर पाहा LIVE UPDATES... 

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात निवडणूक अधिका-यांकडे तक्रार

19 Oct 2024, 09:07 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मविआत अद्यापही 28 जागांवर तिढा- सूत्र

मविआत अद्यापही 28 विधानसभा जागेवरून वाद सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. महाविकास आघाडीमध्ये 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला आहे. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे. मुंबईतील तीन जागांचा तिढा कायम आहे. यात वर्सोवा, भायखळा आणि धारावी या मतदारसंघांचा मुद्दा आहे. या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. वर्सोवा, भायखळा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे.

 

19 Oct 2024, 09:05 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महायुतीचं जागावाटप फायनल - सूत्र 

महायुतीचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती सूत्रांनी झी 24 तासला दिलीय. दिल्लीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत विधानसभेचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती आहे.. दिल्लीत अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रात्री उशीरा बैठक झालीय.. लवकरच आता राज्यात जोरदार प्रचार करण्यात येणार आहे..