19 Oct 2024, 20:44 वाजता
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार केली आहे. आशिष शेलार यांनी व्होट जिहाद या शब्दाच्या वापर केल्याप्रकरणी, वर्षा गायकवाड यांनी मुख्य निवडणूक अधिका-यांकडे तक्रार केली. शेलारांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
19 Oct 2024, 19:17 वाजता
झारखंड निवडणूक 2024 साठी भाजपने 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
19 Oct 2024, 18:04 वाजता
कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे.
19 Oct 2024, 16:32 वाजता
शिवसेनेचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. हिंगोलीत एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना पैशाचं आमिष दाखवल्याचा आरोप होतोय.बांगरांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 24 तासात खुलासा करा अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावली आहे.
19 Oct 2024, 16:14 वाजता
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार माजी मंत्री राजेंद्र शिंगणे शरद पवार पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत. बेलाड पियर च्या राष्ट्रवादी कार्यलयात किव्हा वाय बी चव्हाण सेंटर या ठिकाणी हा पक्ष प्रवेश होईल ...
19 Oct 2024, 15:18 वाजता
विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
19 Oct 2024, 14:23 वाजता
संजय राऊत आणि माझ्यात वाद नाहीत- नाना पटोले
तुम्ही आमच्यात वाद लावू नका. माझ्यात आणि संजय राऊत यांच्यात वाद नाही. संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं की, आमची अधिकृत भूमिका काही नाही. आम्ही काल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आमच्याकडे ३० ते ३५ जागांचा अजूनही निर्णय होऊन अपेक्षित आहे. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा मागण्यासाठी प्रयत्न करत असतो.
मोठा भाऊ छोटा भाऊ नाही असं काही नाही.रमेश चेन्नीथला मातोश्रीलाही जाणार आहेत आणि शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.आज प्रभारी येणार आहेत. त्यांना वेगवेगळ्या भागातल्या मतदारसंघांबाबत आढावा घेतला जाणार आहे
19 Oct 2024, 14:04 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मराठी बांधवांकडून केणेकरांच्या कार्यालयाची तोडफोड, कार्यकर्ते-पोलिसांमध्ये धक्काबुक्की
संभाजीनगरचे भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्या कार्यालयाची तोडफोड मराठा बांधवानी करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी मराठा बांधवांनी केणेकरांविरोधात जोरदार घोषणा दिल्या. संजय केणेकर यांनी जरांगेंबाबत अपशब्द वापरल्यानं त्यांच्या कार्यालयायाती तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यता आलाय. मात्र वेळीच पोलिसांनी कार्यकर्तायांना रोखलंय. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसात धक्काबुक्की झालीय.
19 Oct 2024, 12:53 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शिवसेना UBT पक्षाचे 31 उमेदवार ठरले
मुंबईतील उमेदवार
१) आदित्य ठाकरे - वरळी
२) सुनिल राऊत - विक्रोळी
३) सुनिल प्रभू - दिंडोशी
४) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व
५) वरुण सरदेसाई - वांद्रे पूर्व
६) रमेश कोरगावंकर - भांडुप पश्चिम
७) संजय पोतनीस - कलिना
८)विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर - दहिसर
मुंबई व्यतिरिक्त उमेदवार
९) भास्कर जाधव - गुहागर
१०) कैलास पाटील - धाराशिव
११) उदयसिंह राजपूत - कन्नड
१२) राहुल पाटिल - परभणी
१३) राजन साळवी - राजापूर
१४) वैभव नाईक - कुडाळ
१५) नितीन देशमुख- बाळापूर
१६)शंकरराव गडाख-नेवासा
१७) स्नेहल जगताप - महाड मतदारसंघ
१८) सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम
१९)अद्वय हिरे - मालेगाव बाह्य
२०) नितीन सावंत - कर्जत मतदारसंघ
२१) अनिल कदम - निफाड
२२) दीपेश म्हात्रे -डोंबिवली
२३)सुभाष भोईर - कल्याण ग्रामीण
२४)मनोहर भोईर - उरण
२५) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
२६)राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
२७) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
२८)कन्नड मतदारसंघ - उदयसिंह राजपूत
२९)सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ -
३०) राजन तेली - सावंतवाडी
३१) दीपक आबा साळुंखे - सांगोला
19 Oct 2024, 12:49 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शिवसेना UBT पक्षाचे 31 उमेदवार ठरले
शिवसेना UBT पक्षाचे 31 उमेदवार ठरले, असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळणार आहे. मुंबईतील 8 उमेदवारांची यादी समावेश करण्यात आलंय.
शिवसेनेच्या उमेदवारांची संभाव्य यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. तर 2 आमदारांची उमेदवारी धोक्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवडीतून अजय चौधरी आणि चेंबूरमधून प्रकाश फातर्फेकर यांची उमेदवारी धोक्यात असल्याच बोलं जातंय.