Maharashtra HSC Board Result 2024 LIVE: बारावीचा निकाल जाहीर; 'इथे' पाहा संपूर्ण मार्कशीट

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.   

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE: बारावीचा निकाल जाहीर; 'इथे' पाहा संपूर्ण मार्कशीट

Maharashtra HSC 12th Board Result 2024 LIVE: वर्षभराचा अभ्यास आणि पदवी शिक्षणाच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल, या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीचा निकाल. आज (21 मे 2024) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आज, मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीनं हा जाहीर करण्यात येईल. या निकालामध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध असेल, ज्याची प्रिंट विद्यार्थी काढू शकतील. निकालासंदर्भातले सर्वात वेगवान अपडेट्स आणि इतर सर्व माहिती एका क्लिकवर.... 

 

21 May 2024, 08:55 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: Rechecking आणि उत्तर पत्रिकांच्या प्रतीसाठी नेमकं काय करावं? 

निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेती प्रत हवी असल्यास आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा झाल्यास http:// verification. mh- hsc. ac. in या संकेतस्थळाला भेट द्यावी. इथं विद्यार्थी स्वत: किंवा त्यांच्या महाविद्यालयाच्या वतीनं अर्ज करू शकणार आहेत. गुणपडताळणी अर्थात रिचेकिंग आणि पुनर्मुल्यांकलनासाठीच्या महत्त्वाच्या तारखा आहेत, 22 मे ते 5 जून. 

21 May 2024, 08:14 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: यंदा निकालाची टक्केवारी वाढणार का? 

यंदाच्या वर्षी सीबीएसई आणि आयसीएसईच्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाची टक्केवारी वाढल्याचं लक्षात आलं होतं. जे पाहता आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडूनही घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये निकालाची टक्केवारी वाढते का, याकडेच अनेकांचं लक्ष आहे. 

21 May 2024, 08:01 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: किती विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत? 

यंदाच्या वर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली. यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,46 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामागोमाग कला शाखेसाठी 3, 81,226 आणि वाणिज्य शाखेसाठी 3, 29,905 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम विभागात 37,226 आणि आटीआयमध्ये 4750 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. 

21 May 2024, 07:08 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: 'या' संकेतस्थळावर पाह निकाल

mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org,
hsc.mahresults.org.in

21 May 2024, 07:06 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: कधी पार पडली होती परीक्षा? 

राज्यात यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान पार पडली. ज्यानंतर आता ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे.