Maharashtra HSC Board Result 2024 LIVE: बारावीचा निकाल जाहीर; 'इथे' पाहा संपूर्ण मार्कशीट

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.   

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE: बारावीचा निकाल जाहीर; 'इथे' पाहा संपूर्ण मार्कशीट

Maharashtra HSC 12th Board Result 2024 LIVE: वर्षभराचा अभ्यास आणि पदवी शिक्षणाच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल, या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीचा निकाल. आज (21 मे 2024) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आज, मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीनं हा जाहीर करण्यात येईल. या निकालामध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध असेल, ज्याची प्रिंट विद्यार्थी काढू शकतील. निकालासंदर्भातले सर्वात वेगवान अपडेट्स आणि इतर सर्व माहिती एका क्लिकवर.... 

 

21 May 2024, 11:36 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: निकालाची टक्केवारी वाढली 

महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीनं इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानुसार अधिकृत आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत निकालात 2.12 टक्क्यांची वाढ झाली. 0 टक्के निकाल लागलेल्या संस्था / महाविद्यालयांची संख्या 21, तर 100 टक्के निकाल लागलेली महाविद्यालयांची संख्या 2246 इतकी असल्याचं शिक्षम मंडळाकडून जाहीर करण्यात आलं. 

21 May 2024, 11:31 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल 

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं मंगळवार, दिनांक 21 मे 2024 रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. शिक्षण मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता 
अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहेत. 

21 May 2024, 11:27 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: निकालाची सविस्तर आकडेवारी 

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates

 

21 May 2024, 11:25 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: नऊ विभागीय मंडळ निकालाची आकडेवारी 

  • पुणे 94.44 %
  • नागपूर 92.12 %
  • छत्रपती संभाजीनगर 94.08 %
  • मुंबई 91.95 %
  • कोल्हापूर 94.24 %
  • अमरावती 93.00 %
  • नाशिक 94.71 %
  • लातूर  92.36 %
  • कोकण 97.51 %

21 May 2024, 11:23 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येईल संपूर्ण मार्कशीट? 

  • mahresult.nic.in
  • results.digilocker.gov.in.
  • hscresult.mahahsscboard.in
  • mahahsscboard.in
  • msbshse.co.in
  • hscresult.mkcl.org

21 May 2024, 11:21 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: मुलींनी मारली बाजी 

यंदाच्या वर्षी बारावीच्या निकालांमध्ये मुलींनीच बाजी मारली. बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 95.4 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर, 91.60 टक्के मुलं उत्तीर्ण झाली. 

21 May 2024, 11:18 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: यंदाच्या वर्षीच्या निकालाचा सविस्तर तपशील 

यंदाच्या वर्षी इयत्ता बारावीच्या परीक्षांसाठी 154 विषयासाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांपैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

निकालामध्ये यंदाच्या वर्षीसुद्धा कोकण विभागानं बाजी मारली असून, इथं एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 97.91 टक्के इतकी आहे. तर, सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून, इथं 91.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

21 May 2024, 11:11 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: इयत्ता बारावीचा निकाल जाहीर 

12 वीचा यंदाच्या वर्षीचा निकाल जाहीर. 9 विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली असून, यामध्ये  93 %विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

21 May 2024, 11:06 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

ऑनलाईन पद्धतीनं प्रात्यक्षित परीक्षांचे निकाल घेतल्यामुळं निकाल लवकर लावण्यास मदत झाल्याचं शिक्षण मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 271 भरारी पथकं सक्रीय होती. ज्यामुळं कॉपी आणि तत्सम प्रकार रोखता आला. 

21 May 2024, 10:33 वाजता

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: बोर्डाच्या संकेतस्थळावर कसा पाहावा निकाल? 

  • mahresult.nic.in, hscresult.mahahsscboard.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, or results.digilocker.gov.in. यापैकी कोणत्याही संकेतस्थळावर भेट द्या. 
  • बारावी निकालाच्या वेबपेजवर लँड झाल्यानंतर लॉगईन करण्यासाठी तुमहा हॉलतिकीट क्रमांक टाईप करा. 
  • महत्त्वाच्या माहितीची पूर्तता केल्यानंतर फॉर्म प्रोसिड करा. 
  • काही क्षणात तुमच्यासमोर इयत्ता बारावीचा निकाल आणि विषयांचे तपशीलवार गुण दिसतील.