Maharashtra Breaking News LIVE: आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या? कोणत्या Updates वर राहणार लक्ष? पाहा सर्व अपडेट एका क्लिकवर...
10 Sep 2024, 10:11 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: हसन मुश्रीफ यांची शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या समरजीत घाटगे यांच्यावर नाव न घेता टीका
काही लोकांनी देवेंद्र फडणवीस यांचा गैरफायदा घेऊन त्यांचा विश्वासघात केला अशी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकताच शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या समरजीत घाटगे यांच्यावर नाव न घेता केलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील बाचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात ही टीका केलीय. मला सहा वेळा निवडून दिलं म्हणून आता हवा बदलली असेल असं काहींना वाटतं, अशी हवा बघत राहाल तर तुमचं वाटोळ होईल असं देखील हसण मुश्रीफ यांनी म्हटलंय. इतकंच न्हवे तर मी शरद पवार यांना सांगूनच बाहेर पडलो असा दावा देखील हसन मुश्रीफ यांनी केला.
10 Sep 2024, 09:59 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: अपघात, बावनकुळे आणि... संजय राऊतांचा घणाघात
कारची नंबर प्लेट का काढली? संजय राऊतांचा बावनकुळेंना सवाल. बावनकुळे कुटुंबीयांचा अपघाताशी संबंध नाही तर लपवाछपवी का? फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत अपघाताची निष्पक्ष चौकशी होणार नाही. गाडीचा मालक बावनकुळेंचा मुलगा तर मग एफआरआरमध्ये नाव का नाही? संजय राऊतांचा थेट सवाल.
10 Sep 2024, 09:15 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा श्रेयवाद
महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा श्रेयवाद रंगताना पाहायला मिळतोय. या योजनेच्या संदर्भात भाजपने लावलेल्या बॅनर मधून अजित पवारांचा फोटो गायब झालाय. वांद्रे परिसरात लावलेल्या पोस्टर्स वर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. मात्र या बॅनरवर अजित पवारांना स्थान देण्यात आलेलं नाही. नुकत्याच झालेल्या अमित शाह यांच्या दौऱ्यात देखील अजित पवारांची अनुपस्थिती राजकीय चर्चेचं कारण बनली होती. त्यातच भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नसल्याने आता भाजपलाही अजितदादा नकोसे झालेत का असा सवाल उपस्थित केला जातोय.
10 Sep 2024, 08:35 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: एकिकडे जनसन्मान, दुसरीकडे स्वाभिमानी... पवार कुटुंब इथंही आमनेसामने
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू असतानाच त्यांचे पुतणे शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांची आजपासून बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी यात्रेला सुरुवात होणार आहे. बारामतीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण हे तापू लागले आहे. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे मारुती मंदिरात दर्शन घेऊन युगेंद्र पवार आपल्या यात्रेची सुरुवात करणार आहे त्यानंतर ते माळावरची देवी दर्शन घेऊन पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत दुपारनंतर पुन्हा ते तालुक्यातील गावांमध्ये भेटीगाठी घेणार आहेत. ही स्वाभिमानी यात्रा 12 दिवस तालुक्यात असणार असून योगेंद्र पवार यावेळी पक्षाची विचार जनतेपर्यंत पोचवत मुक्त संवाद साधणार आहेत.
10 Sep 2024, 08:28 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीवासीयांचे पुनर्वसन होणार
मुठा नदीला आलेल्या पुराचा फटका बसलेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीवासीयांचे पुनर्वसन होणार आहे. निया रेषेच्या आत असलेल्या सदनिका तसेच दुकानांचे पुनर्वसन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आलं. एकता परिसरातील इमारतींमधील 1383 सदनिका तसेच 67 दुकानांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 698 कोटी रुपये खर्च करण्यात येऊन क्लस्टर स्वरूपात हे पुनर्वसन होणार आहे.
10 Sep 2024, 07:59 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत
पंधरा ते वीस मिनिटांच्या दिरंगाईनंतर हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत, हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून अप डाऊन मार्गावरील लोकल सुरू. नेरूळ स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही तासांच्या दिरंगाईनंतर लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. नेरूळ स्थानकादरम्यान विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र तांत्रिक बिघाड सोडवण्याचे प्रयत्न रेल्वे जलद गतीने केल्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली आहे.
10 Sep 2024, 07:44 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: उदयनराजे यांनी साता-याच्या पोलीस अधीक्षकांना दम भरला
गणेश विसर्जन मिरवणुकीची वेळ आणि डॉल्बी यावरुन भाजप खासदार उदयनराजे यांनी साता-याच्या पोलीस अधीक्षकांना दम भरला. सातारा शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंची भेट घेऊन, गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांबाबत तक्रारींचा पाढा वाचला. यावर उदयनराजेंनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तसंच प्रशासनानं सांगितलेल्या डेसिबल प्रमाणे डॉल्बी वाजवायला मंडळांना परवानगी द्या, तसंच विसर्जन मिरवणूक रात्री 12 पर्यंत नाही तर त्यानंतरही उशिरा पर्यंत सुरू ठेवण्याचा सूचना त्यांनी केल्या. मात्र त्याचवेळी मिरवणुकीत लेझर लाईट शोचा वापर करु नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी गणेश मंडळांना केलं.
10 Sep 2024, 07:43 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: आजपासून कुटुंब भेट कार्यक्रम
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत, कुटुंब भेट कार्यक्रम आजपासून राज्यभरात राबवण्यात येणारेय. यामध्ये शिवसेनेचे 1 लाख कार्यकर्ते प्रत्येकी 15 कुटुंबांना भेट देणार आहेत. एका आठवड्यामध्ये 1 कोटी कुटुंबांना भेटण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री स्वतः या अभियानात सहभागी होणार असून, ते ठाण्यात 15 कुटुंबांना भेट देणारेत. या योजनेतील लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणं हा यामागचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं.