Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्याचा आज सहावा दिवस आहे. तिथे आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय त्याचा आढावा एका क्लिकवर घ्या...
21 Dec 2024, 14:48 वाजता
राहुल गांधी उद्या परभणीत
परभणी इथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भेट देणार
उद्या 22 तारखेला देणार भेट
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट
विजय वडेट्टीवार देखील परभणी इथे राहुल गांधी यांच्या बरोबर उपस्थित राहणार
21 Dec 2024, 14:07 वाजता
आरोपी बसचालक संजय मोरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी बसचालक संजय मोरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
आज या प्रकरणी सुनावणी पार पडली
चालक संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असून आज न्यालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
या बस अपघातात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला होता
21 Dec 2024, 12:40 वाजता
नवनीत कॉवत बीडचे नवीन पोलीस अधिक्षक
चोवीस तासाच्या आत पोलीस अधीक्षकांनी नियुक्ती
अविनाश बारगळ यांची बदली
संतोष देशमुख हत्या प्रकरण
21 Dec 2024, 12:23 वाजता
संतोष देशमुखांच्या मुलांची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शरद पवार घेणार. तसेच ग्रामस्थांकडून सरकारी नोकरीची मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिली अपहरणाची माहिती
21 Dec 2024, 12:17 वाजता
संतोष देशमुख यांच्या घरी शरद पवार पोहचले आहेत. यावेळी खासदार बोजरंग सोनवणे सोबत असून संतोष देशमुख यांच्या अपहरणाची माहिती प्रत्यक्षदर्शी देत आहेत. संतोष देशमुख यांच्या मुलीने शासकीय नोकरीची मागणी केली आहे.
21 Dec 2024, 12:12 वाजता
शरद पवारांचा संतोष देशमुखांच्या कुटुंबांशी संवाद साधत आहे. शदर पवार या भेटीसाठी मस्साजोगमध्ये दाखल झाले आहेत. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.
21 Dec 2024, 12:07 वाजता
अधिवेशनात बिनखात्याचे मंत्री; म्हणून सरकारचा विक्रम - भास्कर जाधव
42 मंत्र्यांनी शपथ घेतली - भास्कर जाधव
खातेवाटपाशिवाय अधिवेशन संपणार का?
21 Dec 2024, 11:56 वाजता
'एक राज्य, एक गणवेश' योजनेत महत्त्वाचा बदल
'एक राज्य, एक गणवेश' योजनेत बदल करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली आहे. माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची ही महत्वाकांक्षी योजना फसल्यानं आता यात बदल करण्यात आलेत. आधी शासन महिला बचत गटाकडून कपडे शिवून घेऊन विद्यार्थ्यांना पुरवायचं. मात्र शाळा सुरु होऊन सहा सहा महिने विद्यार्थ्यांना गणवेश मिळायचा नाही. मात्र आता शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीला पैसे दिले जातील आणि स्थानिक पातळीवर गणवेश घेतले जातील. या निर्णयामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या ४५ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणाराय. तसंच त्यांना वेळेत युनिफॉर्म मिळणार आहे.
21 Dec 2024, 11:42 वाजता
डंपर खाली चिरडून 2 वर्षाच्या मुलगा ठार
सांगली शहरातील अहिल्यानगर येथे डंपर खाली चिरडून 2 वर्षाच्या मुलगा ठार झाला आहे. मनोज ओंकार ऐवळे, असे मृत मुलाचे नाव आहे. रस्ता ओलांडताना वेगाने येणाऱ्या डंपरखाली आल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी डंपरवर दगडफेक करत काचा फोडल्या पण अपघातानंतर चालक डंपर सोडून पसार झाला आहे.
21 Dec 2024, 10:47 वाजता
महागाई वाढण्याची वाढण्याची शक्यता - नाना पटोले
हे सरकार जनतेच्या मताने निवडून आलेलं नाही
अद्याप मंत्र्यांना खातेवाटर वागी
निवडणुक आयोगाच्या करामतीमुळे आलेलं हे सरकार सरकारला जनतेची भीती