Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्याचा आज सहावा दिवस आहे. तिथे आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय त्याचा आढावा एका क्लिकवर घ्या...
21 Dec 2024, 21:44 वाजता
मूल चोरणारी टोळी समजून भीक मागणाऱ्यांना बेदम मारहाण
मूल चोरणारी टोळी समजून चौघा भीक मागणाऱ्यांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.भिवंडी शहरातील सोमा नगर परिसरातील घटना घडली. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. भीक मागणाऱ्यांमध्ये तीन महिला व एक पुरुष यांचा समावेश आहे. घटनास्थळी तत्काळ भोईवाडा पोलीस दाखल झाले आणि त्यांनी भीक मागणाऱ्यांना मारहाणी पासून वाचवत ताब्यात घेतले.
21 Dec 2024, 21:04 वाजता
खातेवाटप जाहीर
अखेर देवेंद्र फडणवीस सरकारचे खातेवाटप घोषित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री तर अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली.
21 Dec 2024, 21:02 वाजता
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूककोंडी
मालाड ते वांद्रे दरम्यान वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत आहे. मालाड ते अंधेरीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे.
21 Dec 2024, 19:57 वाजता
हिवाळी अधिवेशनात 17 विधेयके मंजूर
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह सिंचन, उद्योग, नदीजोड प्रकल्प, पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांचा लेखाजोखा आणि विकसित, समतोल, सर्वांगिण महाराष्ट्राचा आराखडा मांडण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या अधिवेशनात विविधांगी चर्चेच्या माध्यमातून 17 विधेयके मंजूर करण्यात आली असून जनसुरक्षा विधेयकाबाबत सर्वांना आपले म्हणणे मांडता येण्यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
21 Dec 2024, 19:16 वाजता
शब्द दिल्याप्रमाणे संजय राठोडला मंत्रिमंडळात घेतले - एकनाथ शिंदे
तुम्हाला शब्द दिल्या प्रमाणे संजय राठोडला मंत्रिमंडळात घेतले आहे. त्याला सांगितले आहे, पक्ष संघटना मला मजबूत करून हवी आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आणि पक्ष संघटना मजबूत केली नाही तर....!!! असा प्रश्न विचारून एकनाथ शिंदे संजय राठोड कडे पाहून हसले. त्यांनी एकाप्रकारे राठोड यांना भविष्यासाठी इशारा दिल्याचे म्हटले जात आहे.
21 Dec 2024, 18:59 वाजता
पीकविमा घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा : सुनिल प्रभू
पीकविमा घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा आणि त्यामागे कोण आहे ते शोधून काढा अशी मागणी आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत केली आहे.
21 Dec 2024, 18:07 वाजता
आज रात्री किंवा उद्या सकाळी खातेवाटप जाहीर होणार : देवेंद्र फडणवीस
गेल्या अनेक दिवसांपासून महायुती सरकारचे खातेवाटप कधी होणार यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे.
21 Dec 2024, 17:41 वाजता
अधिवेशनामध्ये 17 विधेयक मंजूर : एकनाथ शिंदे
टीम तिच आहे, फक्त मॅच नवीन आहे. अधिवेशनात 17 विधेयके मंजूर झाली. हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पडलं. नव्या सरकारला आणखी गती देणार. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नांना आम्ही उत्तर दिलं. सर्व योजना जशा आहेत तशा सुरु राहणार. विदर्भातील अनेक प्रकल्पांना आम्ही न्याय दिला. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
21 Dec 2024, 17:35 वाजता
अजित पवार यांनी येथे येऊन आमचं हसू केलं, मस्साजोगमधील गावकरी आक्रमक
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगमध्ये अजित पवार आज कुटुंबाची भेट घेतली. पण या भेटीनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. अजित पवार हे कोणतेही आश्वासन न देता निघून गेल्याचं यावेळी गावकऱ्यांनी म्हटलं. त्यासोबतच धनंजय मुंडे यांच्या कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
21 Dec 2024, 16:41 वाजता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिकविम्याबाबत मोठी घोषणा
- कुणाच्या तरी जमिनीवर कुणीतरी विमा उचलतंय
- पिकविम्याने सर्वोत्तम काम बीड जिल्ह्याने केलं होतं पण आता वेगळा पॅटर्न निर्माण झाला आहे
- सुरेश धस कोणत्याही गॅंगमध्ये नव्हते मग तुमच्याकडे गेले आता पुन्हा आमच्याकडे आलेत
- ते कुठल्याही गँगमध्ये गेले नव्हते
- पिकविम्याचीही सखोल चौकशी करू
- करदात्यांचा हा पैसा आहे, धस साहेब हे प्रकरण आम्ही धसास नेल्याशिवाय राहणार नाहीत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा