Maharashtra Breaking News LIVE Updates:मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशानातील तिसऱ्या दिवसाच्या घडामोडींबरोबरच राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा एकाच क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates:मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

18 Dec 2024, 15:55 वाजता

अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही

- कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली

- अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही

- हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरलाच गुंडाळले जाणार

- विदर्भ व मराठवाड्यावर २ दिवस विशेष चर्चा घेण्याचा प्रस्ताव विरोधकांनी दिला

- सत्ताधाऱ्यांकडून याच कालावधीत चर्चा घडवण्याचे आश्वासन

18 Dec 2024, 14:58 वाजता

शिवसेनेला नगरविकास आणि पर्यटन खातं मिळणार - सूत्र

खातेवाटपात शिवसेनेला नगरविकास आणि पर्यटन ही अतिरिक्त खाती मिळणार

या दोन खात्यांच्या बदल्यात परंतु उत्पादन शुल्क खाते मात्र शिवसेनेला सोडावे लागल्याची माहिती

शिवसेनेकडे असलेली इतर खाती मात्र कायम राहणार

सुत्रांची माहिती

18 Dec 2024, 14:11 वाजता

आपल्याला पेटून उठवायचं आहे - छगन भुजबळ

मला अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत. आमचा तालुका, जिल्हा, राज्यात या असं सांगत आहेत. लासलगावमध्ये आपलं कोणीतरी गेल्यासारखी अवकळा पसरली आहे. आपल्याला पेटून उठवायचं आहे, पण पेटायचं नाही. निषेध करताना आपल्याला संयम पाळायचा आहे असं आवाहन छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये केलं आहे.  

18 Dec 2024, 13:34 वाजता

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: शरद पवार बीडला जाणार

21 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार बीड दौऱ्यावर जाणार आहे. शरद पवार मस्साजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हा मुद्दा विधानसभेत आणि लोकसभेतही विरोधकांनी मुद्दा उचलला होता.

18 Dec 2024, 12:57 वाजता

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगलीत शेतकरी रस्त्यावर; लाल दिव्याच्या गाड्या फोडण्याचा इशारा

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगलीमध्ये आज सामाजिक संघटनांनी एकत्रित येत नागपूर रत्नागिरी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. अंकली येथील रत्नागिरी नागपूर महामार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सुमारे एक तास ठिय्या मारत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकां ताब्यात घेत महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांवर अन्यायकारक असणारा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा या पुढील काळात सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही, प्रसंगी त्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या फोडू असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

18 Dec 2024, 12:51 वाजता

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: पोलिसांना मोठं यश; खरं कारण समोर येणार? 

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या अटकेमुळे अटकेत असलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विष्णू चाटेच्या अटकेमुळे या प्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

18 Dec 2024, 12:01 वाजता

फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

भाजपाचे आमदार राम शिंदे यांचा विधान परिषदेच्या सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून सभापतीपद निवडणुकीसाठी अर्ज भरला जाणार नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची महाविकास आघाडीकडे विनंती केल्याची माहिती समोर येत आहे.

18 Dec 2024, 11:37 वाजता

दिल्लीत मोठी घडामोड! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला

हिवाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत असलेले राज्यसभा खासदार शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार हे दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संम्मेलनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी गेल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मोदींना निमंत्रण पाठवण्यात आलं असून ते उद्घाटन समारंभाला नक्की येतील असा विश्वास व्यक्त केलेला.

18 Dec 2024, 10:48 वाजता

'योग्यवेळ आल्यावर...'; भुजबळांच्या नाराजीवर पक्षाची पहिली प्रतिक्रिया

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्यासंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पहिली अधिकृत प्रतिक्रिया नोंदवली आहे. "योग्यवेळ आल्यावर भुजबळांची भेट घेणार" असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितलं आहे. "भुजबळांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे", असंही तटकरे म्हणाले. "भुजबळांची भेट घेऊन सविस्तर चर्चा आम्ही करणार आहोत", असंही तटकरेंनी सांगितलं. 

18 Dec 2024, 10:35 वाजता

अजित पवार विधानभवनाकडे रवाना

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या नागपूरमधील 'विजयगड' निवासस्थानातून विधानभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत. अजित पवार घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मोठा गराडा दिसून आला.