6 Oct 2024, 09:53 वाजता
मुंबईत उन्हाच्या झळा आणखी वाढणार
Mumbai Temprature : मुंबईकर सध्या उकाड्यापासून हैराण झाले. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत उन्हाच्या झळा बसत आहेत. उकाड्यातून सुटका होणे दूरच, उलट तो वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. मुंबईत पुढील 3–4 दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यताये. तसेच पावसाच्या हलक्या सरीदेखील कोसळण्याची शक्यताये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Oct 2024, 09:33 वाजता
आमदार राजकुमार पटेल सोडणार कडूंची साथ?
Amravati Rajkumar Patel : प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांचा एकुलता एक आमदार कडूंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल उद्या धारणीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी जोरदार बॅनरबाजी केलीय. या बॅनरवरून प्रहार संघटनेचं चिन्ह आणि बच्चू कडूंचा फोट गायब आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो छापण्यात आलाय. त्यामुळे राजकुमार पटेल एकनाथ शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगतेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Oct 2024, 09:15 वाजता
सोलापुरात तोतया IAS अधिकाऱ्याला अटक
Solapur : सोलापुरात तोतया उपजिल्हाधिका-याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यानं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचं आमिष दाखवून 3 जणांची 40 लाख रुपयांची फसवणूक केली. लातूरमध्ये 12वी पास झाल्यानंतर पवन पांढरेनं कामधंदा करण्यासाठी अक्कलकोटमध्ये मावशीकडे आला होता. नातेवाईकांना UPSC परीक्षा पास झालोय आणि सध्या सोलापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असल्याची खोटी माहिती दिली. अक्कलकोट पोलिसांनी कारवाई करत पवन पांढरेला अटक केली. त्याच्याकडं भारत सरकारच्या कार्मिक एवं प्रशिक्षण विभागाचं ओळखपत्रही आढळलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Oct 2024, 08:33 वाजता
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
Railway Mega block : देखभालदुरुस्ती आणि विविध अभियांत्रिकी कारणासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.. मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आलाय.
6 Oct 2024, 08:25 वाजता
ST च्या ताफ्यात लवकरच 5 हजार इलेक्ट्रिक बसेस
ST E-buses : ST च्या ताफ्यात लवकरच 5 हजार इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत.. या बसेस टप्प्याटप्प्याने येणार आहेत... यातील 100 बसेस दाखलही झाल्यात... ST महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी याबाबत माहिती दिलीय... तसेच महामंडळ 2 हजार 200 डिझेल बसेसही खरेदी करणार आहे.. त्यामुळे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळणारेय... तर राज्यातील बस स्थानकांच्या सुधारणेसाठी 110 कोटींची निविदा देण्यात आलीय... पुढील 4 दिवसात प्रसिद्ध होईल, असं गोगावलेंनी यावेळी म्हटलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Oct 2024, 08:09 वाजता
संभाजीराजेंच्या नेतृत्वात पुणे ते गेट वे ऑफ इंडिया रॅली
Sambhajiraje Rally : चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला...अशी घोषणा देत संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात अरबी समुद्रात शोध घेतला जाणारे...आज संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात शिवभक्तांच्या उपस्थितीत पुण्यातून रॅली निघणार आहे.. त्यानंतर चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात येणारे असून गेट वे ऑफ इंडिया येथे ही रॅली पोहोचेल...त्यानंतर अरबी समुद्रात जावून शिवस्मारकाचा शोध घेण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Oct 2024, 07:37 वाजता
रश्मी ठाकरे यांचा ठाणे दौरा
Thane Rashmi Thackeray : उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यातील देवीचं दर्शन घेणार आहे.. आज संध्याकाळी 4 वाजता त्या टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेतील. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रश्मी ठाकरे टेंभी नाक्याला जाऊन, दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेऊन आरती करतील. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत. आनंद दिघे यांनी 1978मध्ये टेंभी नाक्यावरील या नवरात्रौत्सवाची सुरुवात केली होती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Oct 2024, 07:35 वाजता
लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना विषबाधा
Latur Food Poisoning : लातूर शहरातील औसा रोडवर असलेल्या पुरणमल लाहोटी शासकीय मुलींच्या वस्तीगृहातील 30 ते 35 विद्यार्थिनींना विषबाधा झालीय. या वस्तीगृहात साडेतीनशेपेक्षा अधिक मुली राहतात. त्यातील जवळपास 170 मुलींना शासकीय रुग्णालयात हालवण्यात आलं. रात्री मुलींनी जेवण केल्यानंतर काही वेळातच मुलींना त्रास सुरू झाला. त्यानंतर तातडीने ही माहिती वस्तीगृह प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर शासकीय रुग्णालयाच्या 7 रुग्णवाहिका बोलावून जवळपास 170 मुलींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हालण्यात आले आहे. त्यातील 30 ते 35 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित विद्यार्थ्यांना उपचार करून वस्तीगृहात परत पाठवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून तीन रुग्णवाहिका वस्तीगृहा बाहेर स्टँड बाय ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी रुग्णालयात जात उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थिनींची विचारपूस केली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -