6 Oct 2024, 20:01 वाजता
अरबी समुद्रात दोन-अडीच तास शोध घेतला मात्र शिवस्मारक दिसलं नाही- संभाजीराजे छत्रपती
Sambhaji Raje in Mumbai : संभाजीराजे छत्रपतींकडून अरबी समुद्रात शिवस्मारकाचा शोध घेण्यात आला...चला शिवस्मारक शोधायला घोषणा देत संभाजीराजे पुण्याहून मुंबईत आले...गेटवे ऑफ इंडियाकडे जाताना DGP ऑफिसजवळ पोलिसांनी संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवलं...यावेळी पोलिसांनी छत्रपती संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, यावेळी काहीकाळ तणावाचं वातारण निर्माण झालं होतं...मात्र संभाजीराजेंच्या मध्यस्थीने पोलिसांनी कार्यकर्त्यांना सोडून दिलं...त्यानंतर पायी चालत संभाजीराजे छत्रपती गेटवे ऑफ इंडियाकडे गेले...त्यानंतर स्पीड बोटने छत्रपती संभाजीराजेंनी दुर्बिणीच्या सहाय्याने शिवस्मारकाचा शोध घेतला.
दोन-अडीच तास शोध घेतला मात्र शिवस्मारक दिसलं नाही- संभाजीराजे छत्रपती यांची माहिती.. सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक होतं, शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रातच व्हावं- संभाजीराजे यांचा सरकारला सवाल..
राजकारणासाठी शिवरायांच्या नावाचा वापर करू नका.. संभाजीराजे छत्रपतींनी सर्व राजकीय पक्षांना सुनावलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Oct 2024, 17:15 वाजता
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा
Marathi Sahitya Sammelan Adhyaksha : दिल्लीत होऊ घातलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचं नाव जाहीर झालं आहे. ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा असणार आहेत. पुण्यात आयोजित 2 दिवस मराठी साहित्य संमेलनाच्या बैठकीत हा निर्णय झाल
6 Oct 2024, 14:05 वाजता
संभाजीराजेंच्या रॅलीला मुंबई पोलिसांनी अडवलं
Sambhajiraje In Mumbai : चला शिवस्मारक शोधायला घोषणा देत पुण्याहून निघालेल्या संभाजी राजे छत्रपतींच्या रॅलीला मुंबई पोलिसांनी अडवलं...यावेळी संभाजीराजे छत्रपतींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं...यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली...संभाजीराजे अरबी समुद्राकडे जाण्यावर ठाम आहेत.. तर संभाजीराजे छत्रपतींनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय...तर पाच हजार तिकीट काढले आणि दुर्बिणीतून पाहू आणि स्मारकाचं अभिवादन करू असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय...शिवस्मारक पाहण्यासाठी आम्ही येथे आल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणालेत...
6 Oct 2024, 13:09 वाजता
मालाडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई
Mumbai BJP-Congress Rada : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मालाडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. उड्डानपुलाच्या उद्घाटनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये राडा झालाय. महानगरपालिकेनं लिंक रोड इथल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियूष गोयलांच्या हस्ते केले जाणारेय. या उद्घाटनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. परिणामी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूनं धक्काबुक्की करण्यात आली
6 Oct 2024, 12:59 वाजता
धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा
Dharashiv Congress : धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. तुळजापूरच्या सिंधफळ इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काम अपूर्ण असतानाच उद्घाटन का करता? असा सवाल करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राणा जगजितसिंह पाटलांना जाब विचारला. यावेळी आमदार राणा आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. तर हा कार्यक्रम लोकर्पणाचा नाही, असं स्पष्टीकरण आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी दिलंय. हा राजकीय डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Oct 2024, 12:06 वाजता
संजीव सान्याल गोखले विद्यापीठाचे नवे कुलपती
Sanjeev Sanyal : गोखले विद्यापीठाचे नवे कुलपती संजीव सान्याल झालेत. संजीव सान्याल हे अर्थशास्त्रज्ञ आणि इतिहास अभ्यासक आहेत. बिवेक देबरॉय यांच्या राजीनाम्यानंतर सान्याल यांची नियुक्ती करण्यात आलीय. सान्याल पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Oct 2024, 11:20 वाजता
चेंबूरमध्ये घराला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू
Mumbai Fire : मुंबईतील चेंबूरमध्ये एका दुमजली इमारतीला भीषण आग लागली... सिद्धार्थ कॉलनीत ही दुर्घटना घडली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत घरातील लोकांना बाहेर काढलं. जखमींना राजावाडी रुग्णालताय दाखल करण्यात आलं. मात्र त्यातील सात जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दिव्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे..
6 Oct 2024, 10:16 वाजता
राज्यातील बाजार समितीत्या उद्या बंद राहणार
State Bajar Samiti Close : राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुणे येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणून ऐकून न घेता काढता पाय घेतला. त्यामुळे मंत्री सत्तार तसेच शासनाच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व बाजार समिती सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय . महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती संघांना याबाबत पत्रक जारी केलंय. नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा बाजार समिती बंद राहणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Oct 2024, 10:12 वाजता
पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
Pune : पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यताये. कसबा विधानसभा जागेसाठी शहराध्यक्ष धीरज घाटे आणि पोटनिवडणुकीतील उमेदवार हेमंत रासने यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यात आता कुणाल टिळकांनीही उडी घेतलीय. त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत. नवरात्रीचे नवसंकल्प नावाने कसबा विधानसभेत टिळकांकडून कॅम्पेनिंग सुरू करण्यात आलंय. कुणाल टिळक कसबा विधानसभेच्या माजी आमदार दिवंगत नेत्या मुक्ता टिळकांचा मुलगा आहे. बॅनरबाजीच्या माध्यमातून कुणाल टिळकांनी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे भाजपसमोर तिढा वाढण्याची शक्यताये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Oct 2024, 10:06 वाजता
हर्षवर्धन पाटील उद्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार
Indapur Harshwardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे. इंदापुरात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.. शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील पक्षात करणार प्रवेश करणार आहे. त्यानंतर शरद पवार यांची सभा होणार आहे.. सकाळी दहा वाजता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भाजपला मोठा धक्का दिलाय.. दत्ता भरणेंविरोधात विरोधात हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार उमेदवार म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -