19 Nov 2024, 10:51 वाजता
बारामती शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन
Baramati Sharayu Motors : बारामती शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन...श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरशन...शरयू मोटर्स कंपनीचे मालक आहेत श्रीनिवास पवार...श्रीनिवास पवार युगेंद्र पवारांचे वडील...तक्रारीनंतर तपास केला मात्र त्या ठिकाणी काही आढळून आले नाही प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची माहिती...
19 Nov 2024, 10:21 वाजता
कळमनुरीमध्ये वंचित उमेदवार दिलीप मस्केंवर हल्ला
Dilip Musk Attack : कळनुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.. सेलसुरा भागात पाच ते सहा जणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.. तसंच त्यांना मारहाण केली.. या घटनेत दिलीप मस्के गंभीर जखमी झालेत..त्यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला असून त्यांना उपचारासाठी नांदेडला पाठण्यात आलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
19 Nov 2024, 09:47 वाजता
विधानसभेच्या निवडणुकीत गुन्हेगारांचाच बोलबाला
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेल्या 4 हजार उमेदवारांपैकी अनेकांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत..यात 19% टक्के उमेदवारांवर बलात्कार, महिलांवरील अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत..तर 29% उमेदवारांवर इतर गुन्हे दाखल आहेत...सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने उमेदवारांवरील गुन्ह्यांचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले होते..त्यात ही माहिती समोर आलीय...38 % म्हणजेच 829 उमेदवार कोट्यधीश असल्याची माहितीय..दरम्यान 26 उमेदवारांनी आपल्याकडे 1 रुपयांचीही मालमत्ता नसल्याचे नमूद केलंय...22 % उमेदवारांकडे 5 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचं उघड झालंय़..
19 Nov 2024, 09:14 वाजता
आचारसंहितेदरम्यान 660 कोटी मालमत्ता जप्त
Election Commission : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 2019 सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तब्बल पाचपट अधिक मालमत्ता जप्त केली. १५ ऑक्टोबरपासून पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातूंविरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. यात मुंबई शहर आणि उपनगरांत सर्वाधिक मालमत्तेची जप्ती झाली. २०१९ विधानसभा निवडणुकीत १२२.६७ कोटी रुपयांची मालमत्ता
जप्त केली होती.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
19 Nov 2024, 08:42 वाजता
मुंबईत चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ
Mumbai Chikungunya : मुंबईत डेंग्यू आणि मलेरियानंतर आता चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होतेय.... महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या तीन वर्षांमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसते. 2022मध्ये मुंबईत चिकनगुनियाचे 22 रुग्ण होते. 2023 मध्ये ही रुग्ण संख्या वाढून 250 वर गेली. तर यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत 578 रुग्णसंख्या नोंदवण्यात आलीय. मुंबईतच नव्हे, तर राज्यभरात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसते. ऑक्टोबर महिन्यापर्यंत नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ११९९, पुण्यात ७०५ तर मुंबईमध्ये ५७८ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. ताप, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ, थकवा, सांधेदुखी अशी तीव्र स्वरुपाची लक्षणं या आजारात दिसून येतात.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
19 Nov 2024, 08:33 वाजता
संभाजीनगरमध्ये कॅश फॉर व्होटचा प्रकार उघड
Sambhajinagar : संभाजीगरमध्ये कॅश फॉर वोट चा एक प्रकार उघडकीस आला.. या प्रकरणी पोलिसांनी संशयित व्यक्तीला अटक केलीये... संभाजीनगर शहरातील पश्चिम मतदारसंघात मुस्लिम मतदारांना 1 हजार देण्याचे आमिष दाखवले जात होतं.. मतदारांना पैसे देऊन त्यांच्या बोटाला शाई लावली जात होती आणि त्यांचं मतदार कार्ड घेतलं जात होतं.. हा सगळा सगळा प्रकार एक व्यक्तीनं लपून रेकॉर्ड केला, आणि हा व्हीडिओ व्हायरल केला.. तसंच पोलिसांनाही याची माहिती दिली.. त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.. हा सगळा प्रकार उघकीस आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर चांगलाच गोंधळ घातला.. त्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
19 Nov 2024, 07:52 वाजता
राहुल गांधींना पुणे कोर्टाचं समन्स
Rahul Gandhi : राहुल गांधींना पुणे कोर्टाचं समन्स...2 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश...स्वातंत्र्यवीर सावरकर अवमानप्रकरणी समन्स...स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावकरांचा राहुल गांधींविरोधात दावा
19 Nov 2024, 07:34 वाजता
अनमोल बिश्नोईला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून अटक
Anmol Bishnoi Arrested : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून पोलिसांनी अटक केली. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडातला अनमोल बिश्नोई आरोपी आहे.अनमोलवर राष्ट्रीय तपास एजन्सीतर्फे 2 केस दाखल असून 18 अन्य आरोपही दाखल आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन आठवड्यांपूर्वीच गँगस्टर अनमोल बिश्नोईविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं होतं.अनमोलवर NIA ने 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
बातमीचा व्हिडीओ पाहा-