Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 19 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

19 Nov 2024, 17:02 वाजता

डहाणूमध्ये बविआला मोठा धक्का

 

Suresh Padvi in ​​BJP : डहाणू विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आदल्या दिवशी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला. या घडामोडींमुळे डहाणू मतदारसंघातील निवडणुकीत भाजपची ताकद वाढली असून विरोधी पक्षांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरली आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

19 Nov 2024, 16:41 वाजता

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

 

Virar Case Update : पैसे वाटल्याच्या आरोपावरून विरारमध्ये भाजप आणि बविआत राडा.. विरारमधील हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा  क्षितिज ठाकूरांचा आरोप.. विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल. 
आचारसंहितेदरम्यान पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप...  भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा... आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

 

19 Nov 2024, 16:26 वाजता

निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी - विनोद तावडे

 

Vinod Tawde on Virar Case  : पैसे वाटल्याच्या आरोपावरून विरारमध्ये भाजप आणि बविआत राडा.. विरारमधील हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत क्षितिज ठाकूर आणि बविआच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ.. डायरी आणि बॅग दाखवून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केलाय...तर विनोद तावडेंनी सर्व आरोप फेटाळलेत.. निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करण्याची विनोद तावडेंची मागणी.. कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती असं तावडे म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

19 Nov 2024, 14:44 वाजता

विनोद तावडेंकडे 5 कोटी रुपये होते- हितेंद्र ठाकूर

 

Hitendra Thakur : तावडेंकडे 5 कोटी रुपये होते- हितेंद्र ठाकूर...काही डाय-याही मिळाल्या- हितेंद्र ठाकूर...तावडेंनी मला 25 फोन केले- हितेंद्र ठाकूर... 'पोलीस, निवडणूक आयोगाच्या कारवाईकडे लक्ष'.. भाजपच्याच नेत्यानं माहिती दिली- हितेंद्र ठाकूर....झी 24 ताससोबत फोनवरून बोलताना हितेंद्र ठाकूरांनी हे आरोप केलेत...

19 Nov 2024, 13:54 वाजता

निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो, इकडे शेपूट घालतो- संजय राऊत

 

Sanjay Raut : विरारमध्ये भाजप-बविआ राड्यानतंर खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.. भाजपचा खेळ खल्लास!... जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले!..निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो!..अशी बोचरी टीका संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर केलीये

19 Nov 2024, 13:15 वाजता

विरारमध्ये भाजप-बविआत तुफान राडा 

 

Virar Rada : विरारमध्ये भाजप-बविआत तुफान राडा झालाय..विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप..क्षितिज ठाकूरांसह कार्यकर्त्यांचा राडा...क्षितिज ठाकूरांसह कार्यकर्त्यांचा राडा

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

19 Nov 2024, 12:37 वाजता

शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणेंची पक्षातून हकालपट्टी

 

Sharad Sonawane : शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांची पक्षातून हकालपट्टी...पक्ष विरोधी कृती केल्यान शरद सोनावणे पक्षातून निलंबित..महायुतीतील राष्ट्रवादीच्या अतुल बेनकेंविरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूकीला उभं राहिल्याने कारवाई...शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार एकनाथ शिंदेंच्या आदेशावरून कारवाई

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

19 Nov 2024, 12:13 वाजता

मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

 

Melghat : अमरावतीमधील अतिदुर्ग मेळघाटात 6 गावांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय.. आदिवासींना रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा मिळत नसल्याने आदिवासी बांधव आक्रमक झालेत.. रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार अशा गावांचा यात समावेश आहे.. या सहा गावांमध्ये 1 हजार 300 मतदार आहेत.. मुलभत सुविधा मिळत नसल्यानं उद्या मतदान न करण्याचा निर्णय या गावक-यांनी घेतलाय... 

19 Nov 2024, 11:32 वाजता

निवडणूक आयोगाची शिवसेनेला नोटीस

 

Election Commission on Shivsena : निवडणूक आयोगाची शिवसेनेला नोटीस...खासगी वाहिन्यांच्या मालिकेत प्रचार केल्याचा ठपका...24 तासात उत्तर देण्याचे निर्देश ...-काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या तक्रारीनंतर नोटीस

19 Nov 2024, 11:03 वाजता

अंतरवली सराटीत संजय शिरसाटांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

 

Sanjay Shirsata met Manoj Jarange : संजय शिरसाट अंतरवली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...मनोज जारांगे यांच्याबाबत कालीचरण महाराज यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती..संजय शिरसाठ यांच्या मतदार संघात कालीचरण महाराज यांनी टीका केली होती...त्यामुळे संजय शिरसाट हे जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झालेत..