Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 10 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

10 Nov 2024, 08:45 वाजता

सलग 9 दिवस चांदीच्या दरात घसरण

 

Silver Price : चांदीच्या दरात घसरण सुरुच आहे.. चांदीच्या भावात पुन्हा एक हजार रुपयांची घसरण झालीय.. त्यामुळे चांदीचे भाव 92 हजार रुपयांवर आले आहेत... तसेच सोन्याच्या भावातही 100 रुपयांची घसरण झाल्याने, सोन्याचे भाव 78 हजार 200 रुपये प्रति तोळ्यावर आलेत.... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

10 Nov 2024, 08:05 वाजता

पुढील 4 महिने कांदा, लसूण आणखी महागणार

 

Onion, Garlic Prices increased : किरकोळ बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झालाय... कांदा 80 रुपये किलोवर गेलाय... तर लसूण 400 रुपये किलोवर गेलाय... कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवत आहे.... पुढील 3 ते 4 महिने कांदा आणि लसणाचे दर चढेच राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांसह शेतक-यांवर ही होतोय... जोरदार पावसामुळे कांदा सडल्याने कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झालीय... दरम्यान खरिपातील कांद्याची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात काहीसा दिलासा मिळेल .. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

10 Nov 2024, 07:31 वाजता

मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद

 

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील आज भूमिका जाहीर करणार..आज सकाळी जरांगेंची पत्रकार परिषद..मनोज जरांगे काय भूमिका घेणार?..कुणाला पाडायचं.. कुणाला निवडून आणायचं हे ठरवण्याची शक्यता..

10 Nov 2024, 07:23 वाजता

अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर

 

Amit Shah : आज पुन्हा राज्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणारेय. केंद्रीय गृहमंत्री आज महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. बुलढाणा आणि जळगावात प्रचार सभा घेणारेत. अमित शाहांच्या हस्ते आज महायुतीच्या संकल्पपत्राचं प्रकाशनदेखील केलं जाणारे. महिला, तरुण, बेरोजगारीसारखे विषय या संकल्पपत्रात मांडले जाण्याची शक्यताये.

बातमीचा व्हिडीओ पाहा-