9 Nov 2024, 22:47 वाजता
जळगावात 40 लाखांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात तब्बल 40 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये...जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात सायंकाळी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एकाकडून 14 लाख 85 हजार रुपयांची रोकड पकडलीये.. तर चोपडा तालुक्यातील डी. के. पाटील बुलेट वरून जात असताना पोलिसांना संशय आल्याने तपासणीत 14 लाख 85 हजार रुपयांची रोकड आढळून आलीये...तर काल जळगाव शहरात 25 लाखांची रोकड शनिपेठ पोलिसांनी पकडली होती...या कारवायांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळतंय...
9 Nov 2024, 20:34 वाजता
वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील गृहिणी महिलांना दरमहा 3500 रुपये देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीने जाहीरनाम्यात नमूद केलंय..महिलांसाठई राबवल्या जाणा-या योजनेवरुन राजकीय पक्षांमध्ये निवडणूकीच्या तोंडावर जाहीनाम्यात चढाओढ दिसून येतंय...याआधी महायुती सरकारकडून दरमहा 1500 रुपये देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवलीये....त्यानंतर महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये देण्यासंदर्भात जाहीरनामा जाहीर केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Nov 2024, 18:19 वाजता
अजित पवारांचा जयंत पाटलांना टोला
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कासेगावात आजही पोलीस स्टेशन भाड्याच्या जागेत आहे, तुम्हाला तुमच्या गावात पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि राज्याचं नेतृत्व करायला निघाले...उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा समाचार घेतला..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Nov 2024, 18:07 वाजता
शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : परळीमधून शरद पवारांनी धनंजय मुंडेंचा चांगलाच समाचार घेतलाय.. बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवण्यासाठी आग्रही असल्याचं म्हणत.. लोकांना त्रास देणं थांबवण्याचा इशारा शरद पवारांनी दिलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Nov 2024, 18:00 वाजता
अजित पवारांनी अशोक पवारांना सुनावलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिरुरच्या सभेतून अजित पवारांनी अशोक पवारांना चांगलंच सुनावलंय...भावकी होण्याचा फायदा घेऊन घोडगंगा साखर कारखाना बंद पाडल्याचे म्हणत मला बदनाम का करतोय. यापूर्वी दादा दादा करत होता..आणि आता काय झालं..असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट सुनावलं..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Nov 2024, 16:48 वाजता
ठाण्यातील 2 काँग्रेस नेत्यांचं निलंबन
Thane Congress Leader Suspension : विधानसभेत बंडखोरी केलेल्या ठाण्यातील दोन काँग्रेस नेत्यांचे काँग्रेसकडून निलंबन करण्यात आलंय.. मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे यांचे काँग्रेस पक्षाकडून निलंबन करण्यात आलं आहे.. मनोज शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केलीये..तसेच सुरेश पाटील खेडे यांनी देखील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये बंडखोरी केल्याने त्याचं निलंबन केलंय...
9 Nov 2024, 15:42 वाजता
राजकारणात आता तुम्हाला कापणार - उद्धव ठाकरे
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बटेंगे तो कटेंगे घोषणेचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय.माझ्या कार्यकर्त्यांची बोटं कापली तुम्हाला आता राजकारणामध्ये आम्ही कापणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी नांदेडच्या जाहीर सभेत विरोधकांना दिलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Nov 2024, 15:28 वाजता
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची रविवारी जळगावमध्ये प्रचार सभा
Jalgaon Amit Shah Rally : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. रावेरच्या फैजपूरमध्ये अमोल जावळेंच्या प्रचारार्थ सभा होणारे. काँग्रेसचे पहिले अधिवेशन ज्या ठिकाणी झाले होते त्याच फैजपूरमध्ये अमित शाहांची सभा होणारेय. रावेर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात उद्या अमित शाह सभा घेणार आहेत. ते कुणावर निशाण साधणार याकडं सर्वांचं लक्ष आहे.
9 Nov 2024, 15:26 वाजता
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबईत 2 जाहीर सभा
Mumbai Amit Shah Rally : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मुंबईत मोठी जाहीर सभा होणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी बोरिवलीच्या सप्ताह मैदान आणि घाटकोपरच्या जनरल अरुणकुमार वैद्य उद्यानात भाजपकडून विजयी शंखनाद सभांचे आयोजन करण्यात आलंय...मुंबईतील सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरुये... अमित शाहांच्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदीही 14 तारखेला मुंबईत सभा घेणार आहेत...सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Nov 2024, 14:05 वाजता
सांगलीत मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडेंची हत्या
Sangli Murder : सांगलीमध्ये मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या करण्यात आलीये.. मिरज-पंढरपूर रोडवरील राममंदिर परिसरात अज्ञातांकडून हत्या करण्यात आला.. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.. शेत जामीनीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय.. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून गेल्या काही वर्षांपर्यंत मनसेमध्ये सक्रिय होते.. काही दिवसांपूर्वी सुधाकर खाडे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र गेल्या 2 ते 3 वर्षांपासून राजकारणापासून खाडे अलिप्त होते.. पोलिसांकडून पुढील तपास सुरुये..
बातमीचा व्हिडीओ पाहा-