27 Dec 2024, 09:27 वाजता
टीम इंडियाची डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली
Team India Wear Black Armband : टीम इंडियानंही डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण केलीये.. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या सन्मानार्थ टीम इंडिया हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरली.. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीच्या दुस-या दिवशी भारतीय खेळाडूंनी डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण केली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Dec 2024, 09:19 वाजता
नागपूर, वर्ध्यासह पश्चिम विदर्भात यलो अलर्ट
Vidharbha Rain Alert : नागपूर, वर्ध्यासह पश्चिम विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.. दोन दिवस विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय... रब्बी पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Dec 2024, 09:02 वाजता
अकोल्यात अवकाळी पावसाची हजेरी
Akola Rain : अकोला जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालीये.. या पावसामुळे नागरिकांची चागलीच धावपळ उडाली.. काही दिवसांपासन अकोल्यात ढगाळ वातावरण होतं.. आज सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झालीये. या पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.. तसंच बाजारसमितीमध्ये आणलेला सोयाबीनही भिजण्याची भीती आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Dec 2024, 08:19 वाजता
डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
Dr. Manmohan Singh Funeral : माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणारे. यासंदर्भात अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यताये. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिलीय. डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन हे देशाचे दुःखद नुकसान असल्याचं ते म्हटलेत. ते काँग्रेस आणि देशाचे खरे प्रतीक होते, असंही वेणुगोपाल म्हणाले.
27 Dec 2024, 07:49 वाजता
पुण्यातील 29 रक्तपेढ्यांना दणका
Pune Blood Bank : पुणे शहरातील 29 रक्तपेढ्यांना अन्न व औषध विभागानं दणका दिलाय. नियमांचं उल्लंघन करणा-या शहरातील 29 रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आलेत. पुणे विभागात रक्ताचा तुटवडा असताना काही रक्तपेढ्यांनी परराज्यात रक्त आणि रक्त घटकांची विक्री केल्याचं समोर आलं. शहरातील 81 संस्थांची तपासणी करण्यात आलीय. त्यातील 29 जणांचे परवाने रद्द करण्यात आलेत. तर 32 रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
27 Dec 2024, 07:44 वाजता
वाशिममध्ये अवकाळी पावसाचा तडाखा
Washim Unseasonal Rain : वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु झालाय.. कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं.. आज सकाळपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झालीये.. त्यामुळे हवेत गारवा वाढलाय.. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तूर तसंच रब्बी पिकं, फळबागा आणि भाजीपाल्याला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.. दरम्यान हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.. या अवकाळी पावसामुळे शेतक-याची चिंता वाढलीये..