Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

27 Dec 2024, 17:25 वाजता

कुणाच्याही नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको - सुरेश धस

 

Suresh Dhas on Amol Mitkari : आमदार सुरेश धस यांनी आमदार अमोल मिटकरी यांना इशारा दिला आहे.  कुणाच्याही नादी लाग या रगेलच्या नादी लागू नको, असं प्रत्युत्तर धस यांनी मिटकरी यांनी केलेल्या टीकेवर दिलंय. वडिलकीच्या भाषेतून तुला समजवून सांगतो, दुस-यांदा समजवून सांगणार नाही..  पुन्हा बोललास तर तुझं अवघड होईल.. असा धमकीवजा इशाराच धस यांनी दिलाय. 
मंत्रिपद न मिळाल्याने धस यांना पोटशुळ उठलाय, असा आरोप अमोल मिटकरींनी केला होता. त्यावर धस यांनी हा इशारा दिलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

27 Dec 2024, 17:04 वाजता

सुरेश धस असूयेतून धनंजय मुंडेंना लक्ष्य करताहेत- अमोल मिटकरी

 

Mitkari on Suresh Dhas : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जहरी टीका केलीये. धनंजय मुंडे यांना मंत्री पद मिळाल्याच्या असुयेतूनच सुरेश धस त्यांना लक्ष्य करीत असल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरींनी केलाए. सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांची सुपारी कुणी दिलीय?, याचा तपास करण्याची गरज असल्याचे मिटकरी म्हणालेत. तसंच अंजली दमानिया, संजय राऊत आणि संदीप क्षीरसागर एकाच भाषेत कसं बोलताहेत?, असा सवालही मिटकरींनी केलाय. सुरेश धस यांना इशारा देताना हमाम मे सब नंगे होते है असा इशाराही मिटकरींनी दिलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

27 Dec 2024, 14:07 वाजता

संजय राऊतांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

 

Sanjay Raut On Beed : संतोष देशमुख हत्येप्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. तपास निष्पक्षपणे करायचा असेल तर तपास संपेपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको, अशी मागणी राऊतांनी केलीय. वर्षभरात 38 खून पचवले. मात्र, संतोष देशमुखांचा खून पचवता आला नाही, असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Dec 2024, 12:52 वाजता

बीड हत्याकांडाचा आका अजूनही बाहेर - वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar On Beed : सरकार गुन्हेगांच्या पाठीशी आहे असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. बीड हत्याकांडाचा आका अजूनही बाहेर मोकाट फिरत असल्याचं ते म्हणालेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Dec 2024, 12:42 वाजता

हिंगोलीचा इंजिनिअर इराणमध्ये बेपत्ता

 

Hingoli : इराणला गेलेले वसमतमचे इंजिनिअर योगेश पांचाळ यांचा गेल्या 20 दिवसांपासून संपर्क होत नाही. त्यामुळे त्याचे कुटुंब चिंतेत आहे. योगेश पांचाळ यांनी काही महिन्यांपूर्वी कुलरची कंपनी सुरू केली होती. यासंदर्भात आणखी नवीन काय करता येईल का? याची माहिती घेण्यासाठी ते 5 डिसेंबरला इराण गेले होते. मात्र, त्यांचा संपर्क होत नाही. पतीला परत आणा, अशी मागणी योगेश यांच्या पत्नीनं केलीय. तसेच भारतीय दुतावास प्रतिसाद देत नसल्याचा आरोपही त्यांनी केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Dec 2024, 12:29 वाजता

बीडमध्ये उद्या मूकमोर्चाचं आयोजन

 

Beed : बीडमध्ये उद्या मूक मोर्चा आयोजित करण्यात आलाय. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 18 दिवस झाले तरी अद्यापही आरोपी फरार आहेत. या आरोपींना तातडीनं अटक करण्याच्या मागणीसाठी उद्या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चाला आजी-माजी आमदारांसह मनोज जरांगे पाटील हे  सुद्धा उपस्थित राहणार आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Dec 2024, 11:40 वाजता

मस्साजोगनंतर तुळजापुरात सरपंचांवर हल्ला

 

Dharashiv Sarpanch Attack : बीडमधील मस्साजोगच्या  सरपंचावर हल्ल्याची घटना ताजी असताना आता तुळजापुरातही एका सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.. जवळगा गावचे सरपंच नामदेव मिकम यांच्यावर काही गुंडांनी हा हल्ला केला.. नामदेव निकम हे बारूळ गावातून जवळा या त्यांच्या गावी परत येत असताना काही गुंडांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.. तसंच अंडी आणि पेट्रोलचे फुगे मारुन त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला.. या हल्ल्यातून सरपंच थोडक्यात बचावले असून त्यांच्यासह एकजण जखमी झालाय. पवनचक्कीच्या वादातूनच हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतीये.. दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

27 Dec 2024, 10:49 वाजता

वसईत चिमुकल्याच्या अंगावरुन गाडी नेणारा ताब्यात

 

Vasai Crime : वसईत एका 6 वर्षाच्या मुलाच्या अंगावरुन कार नेणा-या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय... वालीवमध्ये या कारचालकानं चिमुकल्याच्या अंगावरुन गाडी नेली होती. यात या मुलाच्या डोक्याला आणि पायाला इजा झाली होती.. दुर्घटनेनंतर हा कार चालक मोबाईल बंद करुन फरार झाला होता. मात्र पोलिसांनी या कार चालकाला ताब्यात घेतलंय.. त्याच्या विरोधात वालीव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.. दरम्यान चिमुकल्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.. 

27 Dec 2024, 10:36 वाजता

अलिबाग, मुरुडमध्ये अवजड वाहनांना बंदी

 

Raigad Traffic : अलिबाग, मुरूड तालुक्यात 2 दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलीय. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 28 आणि 29 डिसेंबर या दोन दिवशी अवजड वाहनांना बंदी असणारे. या दोन्ही दिवशी सुट्ट्या असल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढू शकते. त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Dec 2024, 09:51 वाजता

अंबाजोगाईत तरुणावर चाकू आणि कोयत्याचे वार

 

Beed Attack : बीड जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न आता ;चिंताजनक बनतोय.. कारण  अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर चाकू आणि कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय. चौघांनी तरुणावर चाकू हल्ला केलाय... हल्ल्यात जमीर शेख गंभीर जखमी झालाय..  तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.. पोलीस चौकीसमोर हल्ला झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालंय..