Maharashtra Breaking News Live Update : विधानसभा निवडणुकी जवळ आली असून सगळ्यांचं त्याकडेच लक्ष लागलं आहे. या निमित्तानं महाराष्ट्रात अनेक केंद्रीय मंत्री पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसभरात काय काय घडतंय हे जाणून घेऊया? या लाईव्ह अपडेटमध्ये
15 Nov 2024, 14:01 वाजता
पंढरपुरात जयंत पाटील यांच्याही बॅगांची झाली तपासणी
पंढरपुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बॅगांची झाली तपासणी. जाहीर सभेसाठी जयंत पाटील हे पंढरपूरात आले होते. हेलिकॉप्टरमधील बॅगांची निवडणूक आयोगामार्फत तपासणी. जयंत पाटलांच्या बॅगेत फक्त निघाला जेवणाचा डबा.
15 Nov 2024, 13:11 वाजता
अब्दुल सत्तारांना तुरुंगात टाकणार - उद्धव ठाकरे
सिल्लोडमधील जाहिरसभेत उद्धव ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांचा उल्लेख गद्दार असा करत थेट निशाणा साधला. गद्दारांना गाडा असा आवाहन करत सत्तेत आल्यास इथल्या गद्दाराला तुरुंगात टाकू असं आश्वासन देतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
15 Nov 2024, 12:42 वाजता
जिथं रिकामी मनं, तिथं रिकाम्या खुर्च्या; मोदींच्या सभेवर आदित्य ठाकरेंची टीका
आदित्य ठाकरे मोदींच्या सभेवर म्हणाले, 'काल शिवतीर्थवर सभा घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु गर्दी किती,लोकांचा प्रतिसाद किती होता ते आपण पाहिलं. जिथं रिकामी मनं असतात, महाराष्ट्राला रिकामे करायचे काम केले त्यांनी तिथं रिकामे खुर्च्याच असणार. हाच राग मुंबईकर मतपेट्यांमधून व्यक्त होतील. काल महाराष्ट्रविरोधी लोक शिवतीर्थवर आले होते.'
15 Nov 2024, 12:36 वाजता
तुम्ही ताकद दिली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू - मुख्यमंत्री शिंदे
नांदेडच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडत्या बहिणीचा उल्लेख करत अनेक गोष्टी सांगिातल्या आहेत. लाडक्या बहिणीला विजयी करण्याची विनंती करायला आलोय.
श्रीजयाच्या विजयाची चिंता करण्याची गरज नाही, श्रीजया विजयी होईल. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांचे पोट दुखतंय, छातीत धडकी भरली आहे. पण लाडक्या बहिणी त्यांना हिसका दाखवतील. आम्हाला जेलमध्ये टाकू म्हटले, बहिणींना दीड हजार दिले तर काय गुन्हा केला. ही योजना बंद करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु आहे. ते सरकार असतं तर राज्य दहा वर्ष मागे टाकलं असतं. तुम्ही ताकद दिली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू. घरात बसून, फेसबुक लाईव्ह करून बहिणीची सुरक्षा करणार काय? अशोक चव्हाण यांनी पण उठाव केला आणि आमच्यासोबत आले. हे बंद करू ते बंद करू मग चालू काय करणार. कोणाचाही माईका लाल आला लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. मुलींना शिक्षणासाठी शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला. मी सी एम म्हणजे कॉमन मॅन समजतो. सोयाबीन, कापसाच्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, भाव पडले तर योजना आणली.
15 Nov 2024, 12:23 वाजता
नाव न घेता संजय राऊतांना चंद्रकांत पाटलांना टोला
कोथरूड विधानसभा मतदारसंघात मेळाव्याला शिवसेनेचे संजय राऊत उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले, कोण कोण अंगठ्या वाटतंय पैशाची पाकिटे वाटली जातात. कोथरूडकारांनी भूमिपुत्रांना निवडून दिलं पाहिजे. नाव न घेता चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत ते म्हणाले, मोकाटे भूमिपुत्र आहे. कोथरूड करांनी भूमिपुत्राला निवडून द्यायचं की बाहेरून आलेले पार्सल परत पाठवायचं हे ठरवायचे आहे. सरकारमध्ये पुण्याला स्थान मिळायचं असेल तर चंद्रकांत मोकाटे यांना निवडून द्या असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
15 Nov 2024, 11:29 वाजता
राजठाकरेंकडून मनसेचा जाहिरनामा प्रकाशित
मुलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा मुद्दा, मनसेकडून काय करणार आणि काय केलं हे दाखवणारी 2 पुस्तिका प्रकाशित. प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी, मनसेचा जाहिरनामा.
15 Nov 2024, 10:52 वाजता
15 दिवसांत सोने,चांदीत घसरण
लग्नसराईत फायदा : गुंतवणूकदारांना संधी दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. पंधरा दिवसांत दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 5,700 रुपयांनी कमी होऊन गुरुवारी 74,500 रुपये आणि चांदीचे दर तब्बल 11 हजार रुपयांनी उतरून 89 हजार रुपयांवर स्थिरावले. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोने 900 रुपये व चांदीचे दर 1800 रुपयांनी घसरले. शेअर बाजारातील तेजीमुळे दर घसरल्याची रिपोर्ट्सची माहिती.
15 Nov 2024, 10:51 वाजता
मुंबई विमानतळावर दीड महिन्यात 21 धमक्या
गेल्या दीड महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर 21 धमक्या दिल्या आहेत. नुकतीच अजरबैजानला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब ठेवून प्रवासी प्रवास करत असल्याची धमकी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएफएफ) नियंत्रण कक्षाला आली होती. पण तपासणीत ती माहिती खोटी असल्याचं निष्पन्न झाले होते. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीनं व्हीपीएन नेटवर्कचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मुंबईतील सहार व विमानतळ पोलीस ठाण्यात दीड महिन्यात सुमारे 21 धमकी अथवा खोटी माहिती दिल्याची प्रकरणे घडली असून त्यातील 18 प्रकरणांमध्ये व्हीपीएन नेटवर्कचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे 250 हून अधिक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला.
15 Nov 2024, 10:27 वाजता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर
रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या 3 सभा होणार. 12 वाजता दापोलीत होणार जाहीर सभा, 2 वाजता गुहागरमध्ये होणार सभा. 4 वाजता राजापूरमध्ये सभा होणार. रत्नागिरी जिल्ह्यात चार मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
15 Nov 2024, 10:27 वाजता
संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या गाडीत सापडले 19 कोटींचे दागिने
संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका सराफा दुकानदाराचे जवळपास 19 कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने पकडण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी चेकपोस्टवर स्थिर पथकाने ही कारवाई केली. संभाजीनगर जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या गाड्यांची तपासणी केली असता. त्यांना यात 19 कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगाव येथील एका नामांकित सराफा ज्वेलर्सचे असल्याची माहिती मिळतेय दागिने पकडून जीएसटी विभागाच्या स्वाधीन केले आहेत. दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यात आले आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात आले.