Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी

Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्या यादीपासून, विदर्भातील उमेदवारांच्या अर्जांपर्यंत... सर्व राजकीय घडामोडी एका क्लिकवर   

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी

Loksabha Election 2024 Live : आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ सुरु आहे. बारामती मतदार संघात खुद्द सुनेत्रा पवार यांनी गावखेड्यात जाऊन सामान्यांच्या भेटीगाठी सुरु केलेल्या असतानाच आता अजित पवार गटाच्या अंतिम उमेदवार यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तिथं विदर्भात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नावं जाहीर झालेल्या नेतेमंडळींची लगबगही सुरु आहे. तर, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नुकतीच 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 

राज्याच्या इतरही भागांमध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काय आहेत त्या घडामोडी? इथं पाहा वेगवान अपडेट.... 

27 Mar 2024, 19:25 वाजता

महाराष्ट्रातील महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची (Star Campaigner) नेमणूक करण्यात आलेली आहे. शिवसेना शिंदे गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महादेव जानकर, रामदास कदम, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, इत्यादी नेत्यांची नावं आहेत. 

27 Mar 2024, 19:14 वाजता

पुण्यात आरपीआय आठवले गटाची उद्या राज्य कार्यकारणीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले बैठकीला उपस्थितीत राहाणार आहेत. आरपीआय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शिर्डीची जागा आरपीआयला सोडावी असा आग्रह आहे. शिर्डीची जागा नाही मिळाली तर कार्यकर्त्यांचा महायुतीबाबत आठवले यांच्यावर वेगळा निर्णय घेण्याचा दबाव. महाराष्ट्रात महायुतीने आरपीआय गटाला एकही जागा दिली नसल्याने कार्यकर्ते नाराज. महाविकास आघाडीमध्ये आंबेडकरांनी जी भूमिका घेतली तीच भूमिका आता महायुतीत आठवले गट घेण्याच्या तयारीत

27 Mar 2024, 17:03 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : अमोल कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर होताच कीर्तीकरांना ईडीनं समन्स बजावलंय. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीनं बैठक घेतली. `स्वत:ला अमोल किर्तीकर समजून कामाला लागा´ असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांना दिलेत. तर भाजपनं खालच्या पातळीवरचं राजकारण केलं असून उमेदवारी जाहीर झाल्यामुळेच ईडीनं कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. 

27 Mar 2024, 15:11 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : कोण आहेत महायुतीचे स्टार प्रचारक? 

महाराष्ट्रातील महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या स्टार प्रचारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अशोक चव्हाण, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. 

27 Mar 2024, 15:09 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : माढयात मोहिते पाटील यांचं ठरलं...

माढयात मोहिते पाटील यांचं ठरलं, धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार असून, भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील राहणार त्याच पक्षासमवेत राहणार असल्याची माहिती जय सिंह मोहिते पाटील यांनी दिली. 

माढा लोकसभा मतदार संघात अखेर मोहिते पाटील कुटुंबाने रणजीत सिंह मोहिते पाटील वगळता एकमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकीकडे राज्यात भाजपात इन्कमिंग होत असताना मोहिते पाटील यांनी धाडस दाखवत भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

27 Mar 2024, 14:58 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाची यादी ही, विजयी उमेदवारांची यादी - अरविंद सावंत 

'तिसऱ्यांदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिली याबद्दल मी  उद्धव ठाकरे आणि आमच्या पक्षाचे सर्व नेत्यांचे आभार मानतो. निवडणुकीमध्ये लढाई लढाई असते मी कधीही कोणाला कमी लेखणार नाही. आमची 17 उमेदवारांची जी यादी जाहीर झाली ती विजयी उमेदवारांची यादी आहे असं मी मानतो', अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.  

27 Mar 2024, 13:17 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  राज्यात एकही जागा काँग्रेसची निवडून येणार नाही- धनंजय महाडिक 

राज्यात काँग्रेसची एकही जागा निवडून येणार नाही. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष भाजप आहे, असं म्हणत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची काँग्रेसवर सडकून टीका केली. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांच्या जीवावर ज्या जागा आल्या ते नेते आता भाजपमध्ये आहेत असंही ते म्हणाले. 

27 Mar 2024, 12:51 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : उद्या जाहीर होणार अजित पवार गटाची उमेदवार यादी 

गुरुवारी आपल्या गटाची उमेदवार यादी जाहीर होणार असल्याची स्पष्टोक्ती अजित पवार यांनी केली. वंचितने काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे पण, मागील वेळेस त्यांच्यामुळं अनेकजण पराभूत झाले होते असं वक्तव्य़ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

27 Mar 2024, 12:18 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : भाजपा मध्ये पडली फूट...

भंडारा लोकसभा निवडणुकीमध्ये अचानकच एक नवीन वळण आले आहे. भाजपाचे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संजय कुंभलकर हे बसपा तर्फे उमेदवारी अर्ज भरणार असल्याने या निवडणुकीला वेगळी रंगत निर्माण झालेली आहे. सुरुवातीपासून सुनील मेंढे याच विरोध करणाऱ्या भाजपाच्या विरोधकांना कुंभलकर यांच्या निमित्ताने एक सुवर्ण संधी चालून आली आहे.