Lok Sabha Election 2024 LIVE: धाराशिवमध्ये काँग्रेसला बसणार मोठा धक्का? या बड्या नेत्याची पवारांच्या सभेला अनुपस्थिती

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बड्या नेत्यांच्या सभांची गर्दी... पाहा कोणत्या नेत्याची कुठं असेल सभा... राज्याच्या राजकारणात आजचा दिवस नेमकं कोण गाजवणार...  

Lok Sabha Election 2024 LIVE:  धाराशिवमध्ये काँग्रेसला बसणार मोठा धक्का? या बड्या नेत्याची पवारांच्या सभेला अनुपस्थिती

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वीच्या प्रचारतोफा आज, बुधवारी थंडावणार आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हातात असणाऱ्य़ा अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंक पोहोचण्यासाठी म्हणून राज्यात अनेक ठिकाणी प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 8 मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी इथं मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी राष्ट्रीय नेत्यांनी महाराष्ट्र गाठला आहे. 

24 Apr 2024, 20:39 वाजता

मधुकर चव्हाण भाजपच्या वाटेवर?

धाराशिवमध्ये काँग्रेस ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण शरद पवार यांच्या सभेला गैरहजर राहिल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे. मधुकर चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.  मधुकर चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता मधुकर चव्हाण यांच्या उपस्थितीने महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

24 Apr 2024, 19:50 वाजता

मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत खालावली

धाराशिव येथे दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल केलं गेलंय. अशक्तपणा आणि उष्णतेचा त्रास जाणवल्याने धाराशिव वरून थेट संभाजीनगर इथे आणून गॅलक्सी रुग्णालयात दाखल केलं. दौरा अर्धवट सोडून मनोज जरांगे पाटील संभाजीनगरला येऊन उपचार घेत आहेत.

24 Apr 2024, 18:43 वाजता

 दक्षिण मुंबईच्या जागे संदर्भात उद्या महाराष्ट्र भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा उद्या घेणार दक्षिण मुंबई भाजपची मॅरेथॉन बैठक घेणार आहेत.  शिवडीतील होणाऱ्या बैठकीत तिढा सुटणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  उद्या संध्याकाळी 5 वाजता शिवडी येथे भाजपच्या दक्षिण मुंबईतील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. 

24 Apr 2024, 17:41 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates:   आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार सभेत वंचितचे राहुल गायकवाड यांची उपस्थिती 

- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला सुरुवात 

- मुख्य व्यासपीठावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह सोलापुरातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरलेले राहुल गायकवाड देखील उपस्थित 

- अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल गायकवाड यांनी पक्षातील प्रमुखांना विश्वासात न घेता वंचितची उमेदवारी मागे घेतली होती 

- वंचितच्या माघार मुळे आमदार प्रणिती शिंदे यांना याचा फायदा होईल असे बोलले जात असतानाच राहुल गायकवाड यांची काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी

24 Apr 2024, 16:01 वाजता

आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बद्दल धक्कादायक गोप्यस्फोट  केला आहे. 22 जुन 2022 रोजी वाय बी सेंटरला शरद पवार साहेबाकडे कोण घेऊन चालले होते. आमच्या सर्व आमदारांचा म्होरक्या कोण होतं की जे सांगत होते की भारतीय जनता पक्षासोबत जायला पाहिजे. आपण सत्तेत जायला पाहिजे तेच रोहित पवार आज निष्ठेची भाषा बोलतात. आपण पहिला टर्मचे आमदार आहात थोरात यांचा आदर केला पाहिजे. आपल्या भावना जरूर मांडला पाहिजे परंतु आपण देखील किती पाण्यात आहात हे जनतेला माहित आहे अधिक खोलात न जाता योग्य वेळ आपल्या तोंड बंद करावा अन्यथा आम्ही या आठवड्यात तोंड उघडणार आहोत असा सुनील शेळके यांनी रोहित पवार यांना इशारा दिला आहे.

24 Apr 2024, 14:16 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates:  वर्धा लोकसभा मतदार संघात आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. ही निवडणूक ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद किंवा महानगर पालिकेची नाही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. देशात दोनच पर्याय आहेत . राहुल गांधी यांच्या सोबत 26 पक्षांची खिचडी आहे  राहुल गांधींच्या यांच्यात सगळे डब्बे लागले आहे, राहुल गांधींची खिचडी कशी आहे सगळे बोगीच आहे. शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे,ममता ,लालू म्हणतात आम्ही इंजिन आहे , आता 26 तारखेला बटन दाबलं की रामदासची यांची बोगी डायरेक्ट मोदींच्या इंजिन मध्ये जाईल.

 

24 Apr 2024, 12:42 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : माढ्यात पवारांचा मोदींवर घणाघात 

पंतप्रधान मोदींचं एक काही वर्षांपूर्वीचं भाषण ऐकवत पवारांनी उचलून धरला देशातील वाढत्या महागाईचा मुद्दा. पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशा शब्दांत टीकेचा सूर आळवत त्यांनी आपला मोर्चा इंधन दरवाढीकडेही वळवला. यावेळी शरद पवारांनी एक ऑडिओ क्लिक लावली आणि उपस्थितांनीही ती लक्षपूर्वक ऐकली. शरद पवार सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये सक्रिय झाले असून, पुराव्यांनिशी ते भाजपाला निशाण्यावर घेताना दिसत आहेत. 

24 Apr 2024, 12:23 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : अजित पवार यांच्याशी निगडित कोणत्याही व्यवहारात फौजदारी गुन्हा नाही

अजित पवार यांच्याशी निगडित कोणत्याही व्यवहारात फौजदारी गुन्हा होत नसल्याचा EOW चा क्लोजर रिपोर्टमध्ये निर्वाळा करण्यात आला आहे. क्लोजर रिपोर्टमध्ये सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांना देखील क्लीन चिट मिळाल्याचं सांगण्यात आलं असून, बँकेला कोणतंही आर्थिक नुकसान झालं नसून आत्ता पर्यंत 1343.41 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. 

24 Apr 2024, 11:16 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : पुण्यात आदित्य ठाकरेंचा होणार रोड शो..

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा पुण्यात रोड शो होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा रोड शो होणार असून, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात असतील. दरम्यान, मंगळवारी काँग्रेसचे प्रचार प्रमुख मोहन जोशी यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी रोड शोसंदर्भात चर्चा केली होती. 

24 Apr 2024, 10:31 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : उमेदवार पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार 

भाजप नेत्या आणि बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून महा रॅली काढण्यात येणार असून बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या पारस नगरीच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला छत्रपती उदयनराजे भोसले देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मोठे शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.