Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी येथील तलाव आणि विहिरीतील पाणी आटला आहे. सकाळपासून या ठिकाणी पाणी नसल्याने टँकर रिकामी उभे आहेत. जत तालुक्यामध्ये जवळपास 90 हुन अधिक टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय मात्र तरी देखील टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र तालुक्यात असणाऱ्या पाण्याचा वाढती मागणी आणि उन्हाच्या तीव्रतेने पाण्याचे स्त्रोत आटू लागला आहे.
उटगीतले तलाव जवळपास कोरडा ठाक पडलेला आहे,त्याचबरोबर तिथल्या असणाऱ्या विहिरी मधून सध्या टँकर भरण्याचं काम केलं जातंय,मात्र विहीर देखील आता आटली आहे, त्यामुळे जिथे जवळपास दररोज 30 ते 40 टँकर भरले जायचे तिथे दहा ते पंधरा टँकरच आता भरले जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे आज सकाळपासून तलावाच्या ठिकाणी विहिरी समोर 15 टँकर पाणी भरण्याच्या प्रतीक्षेत थांबून आहेत. दरम्यान तालुक्यातील कोरड्या पडत असलेल्या विहिरी आणि तलावांमध्ये म्हैसाळसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, लवकरच तलाव आणि विहिरी भरल्या जातील आणि पाणीपुरवठा सुरळीत होईल,असं जतच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गावात पाणी नसल्यामुळे मुलांचे लग्न थांबल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पाण्याच्या अडचणीमुळे एक-दोन नव्हे तर तब्बल 30 ते 35 कुटुंबांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतलाय. 1962 पासूनचा हा प्रश्न कोणत्याही सरकारने सोडला नाही. मुंबईत जाऊन मंत्रालयाच्या शेकडो चकरा मारल्या. मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना पत्रव्यवहार केले. पण अजूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. गावात पाणी नसल्याने मुलांचे लग्न होत नाही. या गावात मुली देण्यासाठी पालक देखील घाबरतात? बांबर्डा, बोरखेडी यासह आठ गावांना पाणी टंचाईचे भीषण वास्तव आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील असलेल्या आष्टी तालुक्यातील बांबर्डा, बोरखेडी, थार, चामला, बोटोणा, किन्ही, मुबारकपूर, मोई या आठ गावांना एक वेगळेच ग्रहण लागलेले आहे. या ग्रहणामुळे येथील शाळकरी मुलांना खेळता येत नाही. लग्नाचे वय असलेल्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही आणि सर्वात भयानक म्हणजे याच ग्रहणामुळे काही ग्रामस्थांनी आपले गाव सुद्धा सोडल्याचे समोर आले आहे.