मांजरीनं सिद्ध केलं तिच वाघाची मावशी, व्हिडीओ पाहा तुम्हीही मान्य कराल

वाघाच्या मावशीसमोर उभं राहण्याची हिंमत आहे का कोणाची? मांजरीनं असा दाखवला इंगा, व्हिडीओ 

Updated: Sep 6, 2021, 04:16 PM IST
मांजरीनं सिद्ध केलं तिच वाघाची मावशी, व्हिडीओ पाहा तुम्हीही मान्य कराल title=

योगेश खरे झी मीडिया नाशिक: जंगलाची वाट सोडून आता बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीमध्ये घुसखोरी करू लागला आहे. कोंबड्या, कुत्रे किंवा इतर जनावरांची शिकार करण्यासाठी रात्री बिबट्या गावात संचार करतो. भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्यासोबत मात्र एक विचित्र प्रकार घडला. भक्ष्य मिळालं पण खाता येईना अशी जणू त्याची अवस्थाच झाली होती. 

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील कणकोरी गावात हा प्रकार घडला आहे. शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या आणि मांजर एकाच विहिरीत पडले. मांजराचा पाठलाग करत करत करत गणेश सांगळे यांच्या शेतात आला. मांजरीची शिकार करायला म्हणून झडप घातली आणि तोच विहिरीत कोसळला. बिबट्यासोबत मांजरही या विहिरीत पडली. 

विहिरीला काठ नसल्यानं मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्याही विहिरीत पडला. जीव वाचवण्यासाठी दोघांची धडपड सुरू झाली. भिंतींच्या पडतीला दोघेही आधार शोधू लागले. एकदा तर मांजर बुडत असताना आपल्या पंजानी अलगद पकडत बिबट्याने तिला पुन्हा पडतीवर ठेवले. मांजरीची शिकार करण्याऐवजी त्याने जीव वाचवण्यासाठी केलेली ही मदत सर्वांसाठी चर्चेची ठरली आहे. 

तब्बल 5 तास जीव वाचवण्याचा हा खेळ सुरू होता. याची माहिती वनविभागापर्यंत पोहोचली त्यांनी या दोघांनाही यशस्वीरित्या बाहेर काढलं आहे. शिकारीच्या नाद जेव्हा बिबट्याच्या जीवावर बेतला त्यावेळी शत्रूनंही मांजरीला मदत केली. एकमेकांचा जीव घेण्याच्या नादात जेव्हा जीव धोक्यात येतो त्यावेळेस शत्रुत्व नाहीस होतं हेच यातून दिसून आले अमरावती परिसरात सुद्धा अशाच पद्धतीने बिबटे आणि कुत्र्याचा खेळ काही वर्षापूर्वी रंगला होता. त्यातही बिबट्या आणि कुत्रा जीव वाचवण्यासाठी एकमेकांनाशी प्रेमाने वागत होते.