उद्योग क्षेत्रातील 'मराठी किंग' प्रदीप मराठे यांची खास मुलाखत, व्हिडीओ

वयाच्या चाळीशीत उद्योगात उतरलेल्या प्रदीप मराठे यांची खास मुलाखत.... अधिकारी पदाची नोकरी सोडून व्यवसाय करण्याची प्रेरणा कशी मिळाली?

Updated: Sep 6, 2021, 03:26 PM IST
उद्योग क्षेत्रातील 'मराठी किंग' प्रदीप मराठे यांची खास मुलाखत, व्हिडीओ title=

मुंबई: समाजात अशी काही लोक असतात जी समाजाला पुढे घेऊन जातात. आज प्रत्येक घरात यांच्या ब्रॅण्डचा शर्ट वापरला जातो. आज प्रत्येक घराघरात ज्याचे शर्ट आवर्जून वापरले जातात आणि तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या आवडता ब्रॅण्ड म्हणजे कॉटनकिंग. झी 24 तासचा मराठी लीडर्स विशेष कार्यक्रमात कॉटनकिंगचे चेअरमन प्रदीप मराठे यांची खास मुलाखत झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी घेतली. 

वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अधिकारी पदाची नोकरी सोडली. प्रदीप मराठे यांनी उद्योजक होण्याचं स्वप्न पाहिलं. समाज काय म्हणाले याकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं आपल्याला मराठी माणसांसाठी त्यांना काहीतरी करायचं होतं. 8 लाख रुपयांपासून छोटे खानी सुरू करण्यात आलेला हा उद्योग आज कोट्य़वधी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 

कॉटनकिंग म्हणजे केवळ चाळीशीच्या वरील पुरुषांनी घालायचे शर्ट हा ट्रेन्डही त्यांनी पुसून टाकला. आज अगदी तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत कॉटनकिंगचे शर्ट वापरले जातात. आज प्रदीप मराठे यांचा कॉटनकिंग 400 कोटींची उलाढाल करत आहे. मल्टिनॅशनल कंपनीतून नोकरी सोडून व्यवसायाकडे वळणं हा धाडसी निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला. 

 

शिकलेल्या तरुणांनी खऱ्या अर्थानं व्यवसायात उतरायला हवं असं प्रदीप मराठे यांच्या पत्नी म्हणतात. कारण शिकलेला तरुण हा अधिक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करू शकतो असं त्यांचं मतं होतं. प्रदीप मराठे यांना या व्यवसायात काय अडचणी आल्या? कुटुंबाने कशी साथ दिली हा सगळा प्रवास त्यांनी आपल्या या मुलाखतीमध्ये सांगितला आहे.