विधान परिषद निवडणूक निकाल : अकोल्यात भाजपचा विजय, शिवसेनेचा पराभव

Akola Legislative Council election : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपने (BJP) विजय मिळवला आहे.  

Updated: Dec 14, 2021, 11:50 AM IST
विधान परिषद निवडणूक निकाल : अकोल्यात भाजपचा विजय, शिवसेनेचा पराभव title=
संग्रहित छाया

अकोला : Akola Legislative Council election : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अकोला-बुलडाणा-वाशीममध्ये शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने (BJP) विजय मिळवला आहे. नागपूरनंतर अकोलाही भाजपने सर केले आहे. भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. वसंत खंडेलवाल यांना 438 मत तर शिवसेनेचे (shiv sena) गोपिकीशन बाजोरिया यांना 330 मते मिळालीत.  

भाजपचे बावनकुळे विजयी, काँग्रेसला धक्का

अकोला मतदारसंघात 98.30 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) लढत होती.  अकोला, वाशीम व बुलडाणा या तीन जिल्ह्याच्या संयुक्त मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात थेट लढत झाली. मात्र, या निवडणुकीत भाजपने बाजी मारत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.

दरम्यान, Nagpur Legislative Council Election Results : विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजुने लागला आहे.   भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाले झाले आहेत.  या निवडणुकीत 559 मतदारांपैकी 554 मतदारांनी या निवडणुकीत हक्क बजावला. यात बावनकुळे यांना 362 मते मिळालीत तर मंगेश देशमुख यांना 186 मते मिळालीत. तर 5 मते बाद झालेत.