मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; जुलैपर्यंत पुरणार पाणी, 7 धरणात किती पाणीसाठा?

Mumbai Dam Water Level Today: पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीच्या आठवड्यात दडी मारली होती. आता अखेरच्या आठवड्यात पाऊस चांगलाच बरसत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 26, 2024, 08:24 AM IST
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; जुलैपर्यंत पुरणार पाणी, 7 धरणात किती पाणीसाठा?  title=
Latest Update On Water Levels of Mumbai in 7 Dams is 95 percent

Mumbai Dam Water Level Today: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र आता ऑगस्टअखेरीस पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. घाटमाथ्यावर पावसाने दमदार पुनरागमन केलं आहे. तसंच, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळं धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळं आता मुंबईकरांना जुलैपर्यंतची पाणी चिंता मिटणार आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. सातपैकी पाच जलाशये ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळं मुंबईकरांच्या पुढच्या वर्षीच्या जुलैपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. या सातही धरणांतून तीन हजार ९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. सध्या धरणांमध्ये १३ लाख ७८ हजार ५७७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. त्यामुळं मुंबईतील पाणीपुरवठ्यात 15 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली होती. त्यामुळं मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. आताही मुंबईतील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी येत आहे. पाणी गळतीमुळेही ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळं आता नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. 

अप्पर वैतरणा २,१२,०९९ चार तलाव झाले ओव्हरफ्लो,तुळशी तलाव २० जुलैला, तानसा तलाव २४ जुलैला, विहार तलाव २५ जुलैला मोडक सागर तलाव २५ जुलैला भरून वाहू लागला आहे.