विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! MHT-CET अर्जांमध्ये दुरूस्तीसाठी सीईटी सेल कडून शेवटची संधी

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटीच्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विद्यार्थ्यांना संधी दिली आहे.त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात 30 जूनपर्यंत दुरुस्ती करता येईल. 

Updated: Jun 28, 2022, 10:35 AM IST
विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! MHT-CET अर्जांमध्ये दुरूस्तीसाठी सीईटी सेल कडून शेवटची संधी title=

पुणे : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटीच्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विद्यार्थ्यांना संधी दिली आहे.त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात 30 जूनपर्यंत दुरुस्ती करता येईल. 

विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सीईटी सेलमार्फत पदवी आणि पदव्युत्तर पदी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाते.

त्यात एमएचटी-सीईटीसाठी 6 लाख 6 हजार 142 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.  अर्ज करताना विद्यार्थ्याकडून नाव, जन्मतारीख, छायाचित्र, स्वाक्षरी, विषय गट निवडताना अनावधानाने चुका झाल्या आहेत.

चुकांच्या दुरुस्तीची संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.

या विद्यार्थ्यांनाही 29 जूनपर्यंत आणि 6 ते 11 जुलै या कालावधीत अर्जात दुरुस्त करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.