Kukdeshwar Junnar : जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वराचा परिसर निसर्ग वैभवानं खुलून गेला आहे. या ठिकाणचा हिरवागार निसर्ग बहरला असून त्यावर जणू धुक्याची चादर पसरली आहे. सोसाट्याचा वारा आणी पावसाची संततधार हे सारे विलोभनीय दृश्य मन प्रसन्न करून टाकणारे आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. जुन्नर तालुक्याच्या नाणेघाट परिसरात विकेंडला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. येथील निसर्ग सौदर्यांचा आनंद घेत पर्यटक येथील मनमोहक दृश्याचा आनंद लुटत आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या जोरदार पाऊस बरसत असून जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, गेली अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केल असून बळीराजा शेतकऱ्याला या पावसाने एक दिलासा मिळाला असून या पावसाने आदिवासी शेतकऱ्यांची सध्या शेती कामाची लगबग सुरू झाली आहे.
पावसाळयात साताऱ्यातील कास भागात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. धुकं आणि रिमझिम कोसळणारा पाऊस अशा वातावरणामुळे कास भाग पर्यटकांना खुणावत असतो.सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव भरल्यामुळे त्याचा सांडव्यावरून पाणी पाणी वाहू लागले आहे.सांडव्यावरून खळखळत कोसळणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करून लागले आहेत.हे कोसळणारे पाणी भुशी डॅम सारखं दिसत असले सुरक्षिततेच्या कारणासाठी यात उतरण्यास बंदी करण्यात आली आहे.मात्र भागातील अनेक छोटे मोठे धबधबे आणि निसर्ग यामुळे पर्यटकांची पावले आपोआप कासकडे वळतायत.
पुणे-मुंबई लोहमार्गावरील निसर्ग सध्या डोळ्याचं पारणं फेडतोय. लोणावळा सोडलं की रेल्वे सह्याद्रीच्या पर्वत रांगांतून धावते. दरी, हिरवीगार झाडी धुक्याचं साम्राज्यात हरवून गेलीत अन त्यातुनच खळखळ वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांचं होणारं दर्शन अतिशय विलोभनीय आहे. पुणे ते मुंबई अन मुंबई ते पुणे असा रोजची धावपळ करणाऱ्या चाकरमान्यासाठी खंडाळा ते मंकीहिल प्रवासादरम्यान ही एक पर्वणी असते. कामानिमित्त नेहमी सिंहगड एक्स्प्रेस ने पुणे ते मुंबईला जाणाऱ्या अशाच काही चाकरमानी रेल प्रवाशांसाठी ही पर्वणी असते.