कोरेगाव भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटे विरोधात अटक वॉरंट जारी

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी प्रमुख आरोपी मिलिंद एकबोटे विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.

Updated: Feb 6, 2018, 08:17 PM IST
कोरेगाव भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटे विरोधात अटक वॉरंट जारी title=

पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी प्रमुख आरोपी मिलिंद एकबोटे विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.

शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला होता. शिवाजीनगर सत्र न्यायालयानं एकबोटेंना पकडण्याचं वॉरंट जारी केलं.

एकबोटे यांना अटक करण्यासाठी पोलीस अधिक्षक सुवेज हक यांनी स्वतंत्र पथकं रवाना केली आहेत.

तसंच पोलीस त्यांचा शोध घेतायत. कोरेगाव-भीमामध्ये १ जानेवारी २०१८ ला दोन गटात जातीय तणाव झाल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.